कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या सुरुवातीस शकुनीने श्रुतसेनाचा पराभव केला. त्यानंतर १४व्या दिवशी श्रुतसेनाने भूरिश्रवसच्या लहान भावास श्रुतसेनाने मारले.[१] युद्धाच्या शेवटी दुश्मनर आणि दुर्मुखाशी युद्ध करून त्याने देवव्रद्धाच्या मुलासही मारले.[२]
युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्यासह पांडवांवर निर्वाणीचा हल्ला चढवला. अंधारात झालेल्या या लढाईत आपल्या चार सावत्र भावांसह श्रुतसेन मृत्यू पावला.