श्रुतकर्मा आपल्या वडिलांप्रमाणे धनुर्विद्येत पारंगत होता.
कुरुक्षेत्राच्या युद्धात श्रुतकर्माने पहिल्याच दिवशी कंबोजराज सुदक्षिणचा पराभव केला आणि सहाव्या दिवशी जयत्सेनाला हरविले.[३] त्याने अश्वत्थामा आणि दुःशासनाशी धनुर्युद्धात झुंज घेतली. १६व्या दिवशी श्रुतकर्माने अभिसारचा राजा चित्रसेनास मारले.
युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्यासह पांडवांवर निर्वाणीचा हल्ला चढवला. अंधारात झालेल्या या लढाईत आपल्या चार सावत्र भावांसह श्रुतकर्मा मृत्यू पावला.