विभावरी देशपांडे

जन्म १ फेब्रुवारी, इ.स. १९७९
पुणे, महाराष्ट्र, भारत
इतर नावे विभावरी दीक्षित (पूर्वाश्रमीचे)
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
भाषा मराठी (मातृभाषा)
वडील उपेंद्र दीक्षित
पती हृषीकेश देशपांडे

विभावरी देशपांडे (१ फेब्रुवारी, इ.स. १९७९ - हयात) ही मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे.

कारकीर्द

लेखक व दिग्दर्शक

विभावरी देशपांडेंनी आपली कारकीर्द महाविद्यालयात असताना लेखन व नाटकांत अभिनय करून सुरू केली. राष्ट्रीय नाट्य विद्यालय, दिल्ली येथील अनेक कार्यशाळांमध्ये त्यांनी भाग घेतला. प्रसिद्ध नाटककार सत्यदेव दुबे ह्यांच्या ह्या विद्यार्थी. नाटकांत काम करत असताना त्यांनी संवाद लेखनाचेपण काम केले.[]

"ग्रिप्स थिएटर" या जर्मन नाट्यसमूहासमवेत त्यांनी अनेक बालनाटकांमध्ये काम केले.[] त्यांनी गुम्मा बंडा गुम्मा या कन्‍नड नाटकाचेही दिग्दर्शन केले आहे.[] ग्रिप्ससाठी त्यांनी काही नाटकेही लिहिली. प्रोजेक्ट अदिती, तू दोस्त माह्या ही त्यातील काही नाटके आहेत.

अभिनेत्री

विभावरी देशपांडे यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात २००४ सालापासून केली. श्वास ह्या चित्रपटातून त्यांनी एक छोटीशी भूमिका केली. त्याच वर्षी त्यांचा सातच्या आत घरात हा बहुचर्चित चित्रपट पण सादर झाला. पुढे काही हिंदी चित्रपटांमधून छोट्या भूमिकांतही त्या दिसल्या.

२००९ मध्ये देशपांडेंना त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची भूमिका मिळाली. हरिश्‍चंद्राची फॅक्टरीया चित्रपटात त्यांनी भारतीय चित्रपटांचे जनक मानल्या गेलेल्या धुंडिराज गोविंद फाळके यांच्या पत्‍नीची व्यक्तिरेखा साकार केली.[] त्याकरिता त्यांना मिफ्ताचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिकपण मिळाले.[] पुढील वर्षी, म्हणजे २०१० साली, नटरंग चित्रपटात त्या अतुल कुलकर्णी ह्यांनी साकारलेल्या गुणा ह्या व्यक्तिरेखेच्या पत्‍नीच्या भूमिकेत दिसल्या..[] २०११ साली त्यांनी पुन्हा एकदा एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा वठवली, तीही प्रसिद्ध नाट्यगायक बालगंधर्वांच्या पत्‍नी, लक्ष्मी ह्यांची.[]

इ . स. शीर्षक भूमिका माध्यम टिपणी
२००४ चकवा - चित्रपट संवाद लेखन
२००४ श्वास रिसेप्शनिस्ट चित्रपट
२००४ सातच्या आत घरात केतकी चित्रपट
२००७ दम काटा अनन्याची आई चित्रपट हिंदी भाषा
२००८ मुंबई मेरी जान अर्चना कदम चित्रपट हिंदी भाषा
२००९ हरिश्‍चंद्राची फॅक्टरी सरस्वती फाळके, दादासाहेब फाळके यांची पत्नी चित्रपट
२०१० नटरंग द्वारका कागलकर चित्रपट
२०११ बालगंधर्व लक्ष्मी, बालगंधर्व यांची पत्‍नी चित्रपट
२०११ देऊळ चित्रपट
२०१२ चिंटू चिंटूची आई चित्रपट
२०१२ तुह्या धर्म कोनचा? भुलाबाई चित्रपट
एम एच १२ - मुक्काम पोस्त पुणे नाटक
गुम्मा बंडा गुम्मा - नाटक दिग्दर्शक

कन्नड भाषा

अग्निहोत्र - धारावाहिक संवाद लेखन
२०१७ तुम्हारी सुलू पोलीस अधिकारी हिंदी चित्रपट

व्यक्तिगत आयुष्य

पुणे येथे विभावरी दीक्षित म्हणून जन्मलेल्या देशपांडेंनी आपले शालेय शिक्षण गरवारे विद्यालयातून केले. पुढे फर्ग्युसन महाविद्यालयातून त्या पदवीधर झाल्या. त्यांचे वडील उपेंद्र दीक्षित हे १९३१ मध्ये पित्याने स्थापन केलेले "इंटरनॅशनल बुक सर्व्हिसेस" हे दुकान चालवतात. विभावरींची आई लेखिका आहे. त्यांच्या आजी, मुक्ताबाई दीक्षित ह्याही नाटके लिहीत..[]

संदर्भ

  1. ^ "I am too eager to do variety of roles in films"- Vibhavari Deshpande
  2. ^ "Coming to Grips with reality". 2013-02-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-06 रोजी पाहिले.
  3. ^ All a child's play
  4. ^ "Watch out for 'Harishchandrachi Factory'". 2010-11-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-06 रोजी पाहिले.
  5. ^ Bachchan accepts and confers honours in Marathi films
  6. ^ "Atul Kulkarni's 'Natarang' is powerful". 2010-05-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-06 रोजी पाहिले.
  7. ^ "The real reel". 2014-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-06 रोजी पाहिले.
  8. ^ "'विभावरी देशपांडेचे वडील'". 2014-01-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-02-06 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!