वाराही(IAST: Vārāhī ) ही सप्तमातृकांपैकी एक मातृका आहे. 'वराह अवताराची' शक्ती आहे. नेपाळमध्ये तिला 'बाराही' म्हणतात. हिंदू धर्माच्या चार प्रमुख पद्धतींनी वाराहीची पूजा केली जाते: शैवपंथ, वैदिक धर्म(ब्रह्म्), वैष्णवपंथ आणि विशेषतः शाक्तपंथात. गुप्तपणे वाममार्ग तांत्रिक पद्धतींचा वापर करून रात्री तिची पूजा केली जाते. बौद्ध देवी वज्रवाराही[३] आणि मारीची[४] मुळ हिंदू देवी वाराहीशी संबंधित आहेत.[५]
हिंदू धर्म
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य म्हणजे दुर्गा सप्तशतीनुसार,मातृका या सर्व देवतांच्या शरीराचा शक्तीपासून उत्पन्न झाली;शास्त्र सांगते की वराह अवतारापासून वाराही तयार केली गेली आहे. ती हातामध्ये चक्र ,तलवार धारण करते [५]