वाई तालुका

  ?वाई

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र राज्य
Map

१७° ५५′ ४८″ N, ७३° ५४′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ७०१.४०६ मी
जवळचे शहर सातारा
विभाग पुणे
जिल्हा सातारा
भाषा मराठी
विधानसभा मतदारसंघ वाई विधानसभा मतदारसंघ
तहसील वाई
पंचायत समिती वाई
कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• +०२१६७
• MH 11

वाई हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. हे शहर वाई तालुक्याचे मुख्यालय आहे

पार्श्वभूमी

वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी १७६२ मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हा गणपती वाईचे ग्रामदैवत आहे.

वाईमध्ये सिद्धेश्वर मंदिरातील श्री सिद्धनाथांची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले रोकडोबा हनुमान इत्यादी मंदिरे आहेत.

वाई येथे मराठी विश्वकोश मंडळाचे कार्यालय आहे. येथे वैदिक शिक्षण देणारी प्राज्ञपाठशाला इ.स. १९०१ पासून सुरू आहे.

तालुक्यातील गावे

  1. आभेपुरी
  2. आकोशी
  3. आंबेदरा
  4. अमृतवाडी
  5. अनावाडी
  6. अनपाटवाडी
  7. आसगाव (वाई)
  8. आसळे
  9. आसरे (वाई)
  10. बडेवाडी (वाई)

बळकवाडी बाळेघर बावधन (वाई) बेळामाची भिरदाचीवाडी भिवाडी भोगाव (वाई) भुईंज बोपर्डी बोपेगाव बोरगाव बुद्रुक (वाई) बोरगाव खुर्द (वाई) बोरिव चांडक चांदवाडी चिखली (वाई) चिंधावळी चोराचीवाडी दाह्याट दरेवाडी दासवाडी देगाव (वाई) धावडी धावळी धोम दुईचीवाडी एकसर गाढवेवाडी घेराकेळंजा गोळेगाव गोळेवाडी गोवे (वाई) गोवेडीगर गुळुंब गुंदेवाडी जांब (वाई) जांभळी (वाई) जांभुळणे जोर (वाई) कडेगाव (वाई) कळंभे (वाई) कळंगवाडी काणूर कवठे केंजळ खडकी (वाई) खालची बेळमाची खानापूर (वाई) खवळी (वाई) खोलवाडी किकाळी किरोंदे किसनवीरनगर कोचळेवाडी कोंढावळे कोंढवळी बुद्रुक कोंढवळी खुर्द कुसगाव (वाई) लोगडवाडी लोहारे (वाई) मालतपूर (वाई) माळदेववाडी मालुसुरेवाडी मांढरदेव मापरवाडी वापणवाडी मेणावळी मोहोडेकरवाडी मुगाव (वाई) मुंगसेवाडी नागेवाडी (वाई) नांदगणे न्हाळेवाडी (वाई) निकमवाडी ओहोळी ओझर्डे पाचपुतेवाडी पाणस (वाई) पांचवड पांदे पांदेवाडी पांढरेचीवाडी पराटावाडी पारखंडी पसरणी (वाई) पिराचीवाडी पूर्णाव्याहळी राऊतवाडी (वाई) रेनावळे (वाई) सातळेवाडी शहाबाग शेलारवाडी (वाई) शेंदुर्जणे शिरगाव (वाई) सिधनाथवाडी सोंगिरवाडी सुलतानपूर (वाई) सुरूर उडतरे उळुंब वाडोळी (वाई) वहागाव वाईगाव (वाई) वरखडवाडी वासोळे (वाई) वेळंग वेळे (वाई) विरमाडे विठलवाडी व्याहळी वैजावाडी वडाचीवाडी (वाई) वाडकरवाडी वाई वाशिवळी (वाई) यशवंतनगर (वाई) येरूळी

व्युत्पत्ति

वाई या नावाच्या व्युत्पत्तीविषयी तज्ञांत एकमत नाही. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या मते, ‘वायदेश’ या शब्दातील ‘वाय’ (कोष्टी) यावरून वाई हे नाव पडले असावे.[ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ] स्कंदपुराणांतर्गत कृष्णामाहात्म्यात वाईचा ‘वैराजक्षत्र’ असा उल्लेख आढळतो.[ संदर्भ हवा ] ‘ विराटनगर ’ या नावानेही हे परिचित आहे.[ संदर्भ हवा ][]

इतिहास

सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव अठराव्या व एकोणिसाव्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती, त्‍याच्या खुणा आजही जागोजाग पहायला मिळतात. कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे. एके काळी ते येथील वैशिष्ट्यपूर्ण घाटांसाठी आणि मंदिरांसाठीही प्रसिद्ध होते. पण पुढे वाईच्या कृष्णा नदीचे पाणी इतके कमी झाले की सर्व घाटांची शोभा नष्टप्राय झाली. नाना फडणवीस यांच्यामुळे मेणवली प्रसिद्ध आहे. वाई हे शहर महाभारताच्या काळात विराट राजाची विराटनगरी होती व ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक विकास वाई शहराचा केला होता.

मंदिर परिसर

वाई मधील घाट हे पूर्वी उपासनेसाठी वापरण्यात येत असत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात. पुणे ते वाई हे अंतर कमी असल्याने पेशव्यांनी या शांत व निसर्गरम्य परिसराची उपासनेसाठी निवड केली असे स्थानिक अभिमानाने सांगतात. घाटावर वसलेली गणपती, विष्णू आणि लक्ष्मी यांची मंदिरे ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. या सगळ्या मंदिरांच्या शैलीमध्ये समानता आहे . धातूवरील कलाकुसर, लाकडी स्तंभांचा कलात्मक वापर व पाषाणाने दिलेले अभेद्यपण हे यांचे वैशिष्ट्य.

या मंदिरांमध्ये लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी १७७८ मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पूजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली.मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. उपशिखरांच्या चारही बाजूंना छत्र्या कोरलेल्या आहेत. तसेच भौमितिक आकृत्यांचा वैविध्यपूर्ण वापर करण्यात आला आहे . शिखराची रचना लक्ष्मी यंत्रासारखी करण्यात आली आहे. हे शिखर अठरा मीटर उंच आहे आणि सर्वात वरचा आकार कलशाच्या आकाराचा आहे. गाभाऱ्यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिने हातांत ढाल, तलवार आदी आयुधे धारण केली आहेत. या लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेचे दर्शन घडवितात. देवीची पूजा उत्सव, सणवार नियमितपणे पार पाडले जातात. सभामंडपामध्ये कीर्तन, भजन होते. त्यादृष्टीने या सभामंडपाची रचना करण्यात आली आहे. येथे आवाज घुमत असल्यामुळे ध्वनीक्षेपकाशिवाय शेवटच्या श्रोत्यापर्यंत आवाज पोहचू शकतो.वाई मधील बावधन गावातील बगाड ही यात्रेतील परंपरा प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गणपतीचे मंदिर आहे.[permanent dead link]

हेही पाहा

संदर्भ

  1. ^ वाई, मराठी विश्वकोश,, खंड १५, https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand15/index.php/23-2015-01-16-07-34-00/11554-2012-10-27-11-43-55?showall=1&limitstart=, २९ डिसेंबर २०१५ रोजी पहिले.
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate
सातारा जिल्ह्यातील तालुके
सातारा तालुका | जावळी तालुका | कोरेगाव तालुका | वाई तालुका | महाबळेश्वर तालुका | खंडाळा तालुका | फलटण तालुका | माण तालुका | खटाव तालुका | कराड तालुका | पाटण तालुका

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!