लुझनिकी ऑलिंपिक संकुलामधील भव्य क्रीडा मैदान (रशियन: Большая спортивная арена Олимпийского комплекса Лужники) हे रशिया देशाच्या मॉस्को शहरामधील एक स्टेडियम आहे. १९५६ साली भूतपूर्व सोव्हिएत संघात बांधले गेलेले व ७८,३६० आसनक्षमता असलेले लुझनिकी हे रशियामधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी हे प्रमुख स्थळ होते. आजवर हे स्टेडियम मुख्यत: फुटबॉल सामन्यांसाठी वापरले गेले आहे. युएफाच्या १९९९ युएफा युरोपा लीगसाठीचा अंतिम सामना तसेच २००८ सालच्या युएफा चँपियन्स लीगचा अंतिम सामना येथे खेळवण्यात आला होता.
रशियात होणाऱ्या २०१८ फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना लुझनिकी स्टेडियममध्ये खेळवला जाईल.
बाह्य दुवे