ली म्युंग-बाक (कोरियन: 이명박; १९ डिसेंबर १९४१) दक्षिण कोरियाचा १०वा राष्ट्राध्यक्ष होता. म्युंग-बाकच्या २००८ ते २०१३ दरम्यानच्या कारकिर्दीत दक्षिण कोरियाने जागतिक स्तरावर आपली छाप व प्रभाव बळकट केला. उत्तर कोरियाच्या बाबतीत म्युंग-बाकने विरोधी दोरण बाळगुन त्या देशासोबत सामंजस्याच्या वाटाघाटी करण्यास नकार दिला.