लिमा ही पेरू ह्या दक्षिण अमेरिकेमधील देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. ते शिलोन, रिमाक, लुरिन नद्यांच्या खोऱ्यात, पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. २००७ सालापर्यंत ८४ लाखांवर लोकसंख्या पोचलेले लिमा महानगर क्षेत्र लॅटिन अमेरिकेतील मेक्सिको सिटी, साओ पाउलो, बुएनोस आइरेस व रिओ दि जानेरो या शहरांपाठोपाठ पाचवे मोठे शहर बनले आहे.
बाह्य दुवे