लाऊआर (फ्रेंच: Loire) ही फ्रान्स देशातील सर्वात लांब नदी आहे. एकूण १,०१२ किमी लांबी असलेली ही नदी दक्षिण फ्रान्सच्या डोंगराळ भागात उगम पावते, फ्रान्सच्या मध्य व पश्चिम भागामधून वाहते व अटलांटिक महासागराला मिळते.
लाऊआर नदीच्या खोऱ्याला फ्रान्सची बाग असे म्हणले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर वाईन बनवली जाते. येथील निसर्गसौंदर्यासाठी लाऊआर खोऱ्याचा युनेस्कोच्याजागतिक वारसा स्थानांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.