Renu Devi (es); Renu Devi (fr); Renu Devi (ast); Renu Devi (ca); रेणू देवी (mr); Renu Devi (ga); Renu Devi (sl); رینو دیوی (ur); രേണു ദേവി (ml); Renu Devi (nl); Renu Devi (it); रेणु देवी (hi); ᱨᱮᱱᱩ ᱫᱮᱵᱤ (sat); ਰੇਣੂ ਦੇਵੀ (pa); Renu Devi (en); రేణు దేవి (te); ರೇಣು ದೇವಿ (kn); Renu Devi (yo) política india (es); ভারতের প্রথম মহিলা উপ-মুখ্যমন্ত্রী (bn); personnalité politique indienne (fr); سیاستمدار هندی (fa); India poliitik (et); politikari indiarra (eu); politikane indiane (sq); política india (ast); política índia (ca); Indian politician (en); سياسية هندية (ar); política indiana (pt); Indian politician (en-gb); հնդիկ քաղաքական գործիչ (hy); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ paɣa (dag); politiciană indiană (ro); política india (gl); politica indiana (it); פוליטיקאית הודית (he); indisk politiker (sv); indisk politikar (nn); індійський політик (uk); Indiaas politica (nl); polaiteoir Indiach (ga); ഇന്ത്യയിലെ ഒരു രാഷ്ട്രീയപ്രവര്ത്തക (ml); ᱥᱤᱧᱚᱛᱤᱭᱟᱹ ᱨᱟᱡᱽᱟᱹᱨᱤ (sat); indisk politiker (da); Indian politician (en); Indian politician (en-ca); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); இந்திய அரசியல்வாதி (ta)
रेणू देवी Indian politician |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
जन्म तारीख | इ.स. १९५८ बेतिया |
---|
नागरिकत्व | |
---|
शिक्षण घेतलेली संस्था | |
---|
व्यवसाय | |
---|
राजकीय पक्षाचा सभासद | |
---|
पद | - Member of the Bihar Legislative Assembly
|
---|
|
|
|
रेणू देवी (जन्म १ नोव्हेंबर १९५९) या भारतीय राजकारणी आहेत ज्यांनी १६ नोव्हेंबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२२ पर्यंत बिहारच्या ७ व्या उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे.
२०२० मध्ये त्या बिहारमधील भारताच्या पाचव्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या.[१] त्या भारतीय जनता पक्षाच्या माजी राष्ट्रीय उपाध्यक्षा आहे. त्या बिहार विधानसभेच्या सदस्य आहेत आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पक्षाच्या उपविधीमंडळ नेत्या आहेत.[२][३][४][५][६][७]
वैयक्तिक जीवन
रेणू देवी ह्या त्यांच्या आईवडिलांच्या तीन मुलं आणि पाच मुलींपैकी सर्वात मोठ्या आहे. त्या नोनिया जातीतून, एक अत्यंत मागासवर्गीय (EBC) समुदायाच्या आहे.[८] १९७७ मध्ये बाबासाहेब भीमराव आंबेडकर बिहार विद्यापीठातून त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले.
१९७३ मध्ये कोलकाता स्थित दुर्गा प्रसाद यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.[९] तथापि, लग्नाच्या सात वर्षातच पतीच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्या माहेरी परतल्या. त्यांना दोन मुलं आहेत.[१०]
राजकीय कारकीर्द
रेणू देवी यांची आई संघ परिवाराशी संबंधित होती, ज्याचा त्यांच्यावर जोरदार प्रभाव असल्याचे म्हणले जाते.[११] रेणू देवी विश्व हिंदू परिषदेच्या महिला शाखा दुर्गा वाहिनीचा देखील एक भाग होत्या.[१२]
१९८१ मध्ये सामाजिक कार्यातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून, नंतर १९८८ मध्ये त्या भाजप महिला मोर्चामध्ये सामील झाल्या. पुढच्या वर्षी चंपारण प्रदेशात शाखाप्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. १९९३ आणि १९९६ मध्ये त्यांची दोन वेळा विंगच्या राज्य प्रमुख म्हणून निवड झाली.[१३]
१९९५ मध्ये त्यांनी आपली पहिली निवडणूक नौतन विधानसभेच्या जागेवरून लढवली ज्यात त्या अयशस्वी झाल्या. पण नंतर पश्चिम चंपारण जिल्ह्याचा आणखी एक विभाग असलेल्या बेतिया येथून बिहार विधानसभेवर चार वेळा निवडून येण्यात त्या यशस्वी झाल्या.
२००५ ते २००९ दरम्यान त्यांनी बिहार राज्य सरकारमध्ये क्रीडा, कला आणि संस्कृती मंत्री म्हणून काम पाहिले. २०१४ ते २०२० दरम्यान त्या भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा होत्या आणि अमित शहा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीचे सदस्य म्हणून नामांकन केले होते.[१२] २०२० मध्ये बिहारच्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती सकारात्मकरित्या स्वीकारली गेली.[१४][१५][१६][१७]
संदर्भ