यिंच्वान (चिनी: 银川市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील निंग्स्या या स्वायत्त प्रदेशामधील सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०२० साली यिंच्वानची लोकसंख्या सुमारे २९ लाख होती. पिवळ्या नदीच्या काठावर वसलेले यिंच्वान हे ११व्या शतकामधील पश्चिम शिया साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते.
यिंच्वान शहर लानचौ, शीआन व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. यिंच्वान हेदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे