मेम्फिस आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: MEM, आप्रविको: KMEM) हा अमेरिका देशाच्या टेनेसी राज्यातील मेम्फिस ह्या शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. मेम्फिस येथे फेडेक्स ह्या कंपनीच्या फेडेक्स एक्सप्रेस ह्या मालवाहू विमान वाहतूक कंपनीचा सर्वात मोठा वाहतूकतळ आहे. ह्या कारणास्तव हाँग काँग विमानतळाखालोखाल मेम्फिस विमानतळ मालवाहतूकीच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा विमानतळ आहे. परंतु प्रवासी वाहतूकीच्या बाबतीत मेम्फिस विमानतळावरील प्रवाशांची संख्या २०१३ ते २०१४ ह्या काळादरम्यान २२ टक्क्यांनी घटली. एकेकाळी डेल्टा एरलाइन्सचा हब असलेल्या मेम्फिस विमानतळावर सध्या रोज ८३ प्रवासी विमाने थांबतात.