मिलोस राओनिच (मॉंटेनिग्रिन: Милош Раонић; २७ डिसेंबर १९९०) हा मॉंटेनिग्रोमध्ये जन्मलेला एक व्यावसायिक कॅनेडियन टेनिसपटू आहे. २००८ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असलेला राओनिच सध्या कॅनडाचा सर्वोत्तम टेनिस खेळाडू मानला जातो.
राओनिच त्याच्या वेगवान व अचूक सर्व्हिससाठी प्रसिद्ध आहे. राओनिचने २०१६ विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती परंतु त्याला अँडी मरेकडून पराभव पत्कारावा लागला. ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा तो आजवरचा एकमेव कॅनेडियन टेनिस खेळाडू आहे.
बाह्य दुवे