मस्कत आंतरराष्ट्रीय विमानतळ (अरबी: مطار مسقط الدولي) (आहसंवि: MCT, आप्रविको: OOMS) हा ओमान देशामधील सर्वात मोठा व मस्कत शहराचा प्रमुख विमानतळ आहे. हा विमानतळ मस्कतच्या पश्चिमेस ३२ किमी अंतरावर भागात स्थित आहे. ओमानची राष्ट्रीय विमान कंपनी ओमान एरचे मुख्यालय व प्रमुख वाहतूकतळ येथेच आहे. एर इंडिया, एर इंडिया एक्सप्रेस, जेट एरवेझ, इंडिगो, स्पाईसजेट इत्यादी अनेक भारतीय विमान वाहतूक कंपन्या मस्कतला प्रमुख भारतीय शहरांसोबत जोडतात.
बाह्य दुवे