मधुवंती दांडेकर या मराठी संगीत नाट्यसृष्टीतल्या एक अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म २३ मार्च १९४८ रोजी झाला.
कारकीर्द
मराठी संगीत नाटकांमध्ये काम करीत असताना मधुवंती दांडेकर यांना एका उर्दू नाटकात काम करण्याची संधी मिळाली. त्यासाठी त्या खास उर्दू शिकल्या. ती भूमिका त्यांनी इतकी छान वठवली की, अनेक उर्दू भाषिकांना त्यांची मातृभाषा उर्दूच वाटली. भूमिकेत स्वतःला झोकून देण्यासाठी वाटेल ते श्रम घेण्याची तयारी व त्यासाठीचा अट्टाहास येथे दिसतो. विद्याधर गोखले यांच्या 'गझलांचा गुलशन' या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग त्यांनी केले. त्यासाठी तर त्या प्रसिद्ध गझल-गायक श्री. विजय चौहान यांच्याकडे गझलही शिकल्या.
मधुवंती दांडेकर यांना एकदा गुजराती नाटकात भूमिकेसाठी विनंती करण्यात आली होती. ते नाटक म्हणजे मराठी सुवर्णतुलाचे गुजराती रूपांतर होते. नाटकाच्या निर्मात्याला रुक्मिणीसाठी सुयोग्य गुजराती अभिनेत्री मिळत नव्हती. मधुवंती दांडेकरांनी सर्व संवाद मराठी देवनागरीत लिहून घेतले,भूमिका समजून घेऊन अभ्यास केला आणि रुक्मिणीची ती भूमिका उत्तम रीतीने वठवली.
बालगंधर्व हे मधुवंती दांडेकरांचे संगीतातले आदर्श. तसा त्यांना अध्यात्मातही रस आहे. त्यासाठी विमला ठकार यांना त्या गुरू मानतात. विमला ठकारांच्या एका पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे तसेच त्यांच्या काही हिंदी पुस्तकांचे मराठी भाषांतरही केले आहे.
पुरस्कार
इ.स.२००४चा मधुकर महाजन पुरस्कार
इ.स.२००५चा अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
इ.स.२००७चा बालगंधर्व पुरस्कार
मधुवंती दांडेकर यांनी गायलेली प्रसिद्ध गीते आणि त्यांच्या नाटकांतील भूमिका