भारतीय किसान संघ ( बीकेएस ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न एक भारतीय शेतकऱ्यांची प्रतिनिधी संस्था,[१] आणि संघ परिवाराची सदस्य आहे.[२] या संस्थेचे जवळपास ३०,००,००० सभासद आहेत. भारतातील सर्व राज्यांमध्ये यांच्या शाखा आहेत. मार्च 2005 रोजी, भारतीय किसान संघाने भारत सरकारकडे कृषी पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सुमारे 20 अब्ज रुपयाचा फंड स्थापन करण्याची मागणी केली.[३] 2007 मध्ये बीकेएसने गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) सरकारवर नाराजी दर्शविली आणि त्यावेळच्या कापसाच्या किंमतींबाबत असमाधानी असल्यामुळे सौराष्ट्रात शेतकरी आंदोलन केले.[४]
संदर्भ
बाह्य दुवे