जत्तींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जमखंडी नगरपालिकेपासून केली. यानंतर ते जमखंडी विधानसभेवर निवडुन गेले. मजल-दरमजल करीत त्यांनी कर्नाटकचेमुख्यमंत्रीपद व ओडिशाचे राज्यपालपद मिळवले. इ.स. १९७४ ते इ.स. १९८० पर्यंत ते भारताचे उपराष्ट्रपती होते व फेब्रुवारी ते जुलैइ.स. १९७७ या कालखंडात त्यांनी कार्यवाहू राष्ट्रपतीपद सांभाळले.