दिलीपराव शंकरराव बनकर हे एक मराठी राजकारणी असून ते महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते निफाड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सदस्य आहेत.[१][२][३]
जीवन परिचय
दिलीपराव बनकर यांचा जन्म २६ जुलै १९६४ रोजी झाला. पिंपळगाव बसवंत या आपल्या गावातीलच महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतली.
शैक्षणिक पात्रता
दिलीपराव बनकर यांनी क.का.वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव बसवंत मधून एम.कॉम. चे शिक्षण पूर्ण केले आहे.
राजकीय प्रवास
- २०१९ - निफाड मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले[४]
- २०२३ - सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत[५][६]
संदर्भ