दिमापूर

दिमापूर
भारतामधील शहर

दिमापूरचे हवेमधून घेतलेले छायाचित्र
दिमापूर is located in नागालँड
दिमापूर
दिमापूर
दिमापूरचे नागालॅंडमधील स्थान
दिमापूर is located in भारत
दिमापूर
दिमापूर
दिमापूरचे भारतमधील स्थान

गुणक: 25°54′45″N 93°44′30″E / 25.91250°N 93.74167°E / 25.91250; 93.74167

देश भारत ध्वज भारत
राज्य नागालॅंड
जिल्हा दिमापूर
क्षेत्रफळ १२१ चौ. किमी (४७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४७६ फूट (१४५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १,२२,८३४
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


दिमापूर हे भारत देशाच्या नागालॅंड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. दिमापूर शहर नागालॅंडच्या पश्चिम भागात राजधानी कोहिमाच्या ६८ किमी वायव्येस आसाम राज्याच्या सीमेवर वसले आहे. २०११ साली १.२२ लाख लोकसंख्या असलेले दिमापूर ईशान्य भारतामधील एक आघाडीचे शहर मानले जाते.

राष्ट्रीय महामार्ग ३९राष्ट्रीय महामार्ग ३६ हे ईशान्य भारतामधील प्रमुख महामार्ग दिमापूरमधून जातात. दिमापूर विमानतळ हा नागालॅंड राज्यामधील एकमेव कार्यरत विमानतळ आहे. दिमापूर रेल्वे स्थानक गुवाहाटी-दिब्रुगढ रेल्वेमार्गावर स्थित असून दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस, ब्रह्मपुत्रा मेल, कामरूप एक्सप्रेस, गुवाहाटी-जोरहाट जन शताब्दी एक्सप्रेस इत्यादी गाड्या येथे रोज थांबतात.

येथे हिडिंबा नावाचा वाडा आहे.त्यात बुद्धिबळाच्या आकाराच्या सोंगट्या आहेत. रामायणातील भीमाची पत्नी हिडिंबा ही इथली राजकुमारी होती असे म्हणतात.त्यामुळे या शहरास हिडिंबानगारी असेही नाव आहे.[ संदर्भ हवा ] या ठिकाणी डिमाशा जातीचे लोक राहतात जे स्वतःला हिडिंबाचे वंशज मानतात.भीमपुत्र घटोत्कच व भीम येथे या विशाल सोंगट्यांच्या सहाय्याने बुद्धिबळ खेळत असे, असे म्हणतात. त्यावरून ते किती बलवान होते याचा अंदाज करता येतो. इतिहासकारांच्या मते या सोंगट्या म्हणजे तेथील कछरी राज्याचे अवशेष आहेत. कछरी ही दिमापूरची फार पूर्वीच्या काळातली राजधानी होती. हे एक छान पर्यटनस्थळ आहे.[]

संदर्भ

  1. ^ तरुण भारत ई-पेपर, नागपूर "बुद्धिबळाचा विशाल पट" Check |दुवा= value (सहाय्य). ०६/११/२०१६ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!