हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील चंबा जिल्ह्यातील एक गाव आहे. हे थंड हवेचे ठिकाणही आहे. पाच टेकड्यांवर वसलेल्या या गावाची समुद्रसपाटीपासूनची अधिकृत उंची १,९७० मी (६,००० फूट) आहे.[१]
डलहौसी हे धौलाधर पर्वत रांगेत असलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. पाच पर्वत (काथलाँग, पोट्रेन, तेहरा, बाक्रोटा आणि बाळू) वर वसलेले हे हिल स्टेशन चंबा जिल्ह्याचा एक भाग आहे. १८५४ मध्ये ब्रिटिशांनी ते बांधले व विकसित केले आणि त्या जागी तत्कालीन व्हायसराय लॉर्ड डलहौसीच्या नावाने ह्याला डलहौसी नाव ठेवले गेले. ब्रिटिश सैनिक आणि नोकरशहा येथे उन्हाळ्याच्या सुट्टी घालवण्यासाठी येत असत. मोहक मैदाने आणि पर्वत वगळता इतर आकर्षणे प्राचीन मंदिरे, चंबा आणि पंगी खोरे आहेत.
इसवी सन १८५३ सालीब्रिटिशांनी तेव्हाच्या चंबाच्या राजाकडून जमीन खरेदी करून डलहौसी हे हिल स्टेशन विकसित केले.[[रविंद्रनाथ टागोर ह्यांनी आपली पहिली कविता येथे लिहिली. सुभाषचंद्र बोस दुसऱ्या विश्व युद्धाच्या वेळी येथे गुप्त योजना आखण्यासाठी आले होते. त्यामुळे डलहौसीला सुभाषनगर असेही नाव पडले होते. येथे पर्यटक शहीद स्मारक,सातधारा,सुभाष बावली बघण्यासाठी येतात.गांधी चौकापासून पंचपुला दोन कि.मी. अंतरावर आहे. शहिद अजित सिंग ह्यांचे येथे स्मारक आहे. अजित सिंग हे सुभाषचंद्र बोस आणि इंडियन नेशनल आर्मी चे समर्थक होते. सातधारा व सुभाष बावली येथे झरे आहेत. ते औषधी गुणधर्म असलेले आहेत असे लोक म्हणतात. सुभाषचंद्र बोस ह्यांनी या झऱ्यांचे पाणी सेवन केले होते असे म्हणतात. म्हणून त्याला सुभाष बावली म्हटले जाते. डलहौसी पासून कालाटॉप हे पर्यटन स्थळ ९ कि.मी.अंतरावर आहे. कालाटॉप पासून खजियार हे पर्यटन स्थळ २२ कि.मी. अंतरावर आहे. खजियार हे मैदान आहे आणि ते हिरवेगार आणि गोलाकार आहे. चोहोबाजूंनी देवदार वृक्ष आहेत. मध्यभागी एक तळे आहे.डलहौसी पठाणकोट पासून ८० कि.मी.अंतरावर आहे.[२]
डलहौसी एक अतिशय सुंदर आणि मनमोहक हिल स्टेशन आहे. डोंगरांनी वेढलेल्या या ठिकाणी बरयाच गोष्टी पाहायला मिळतात.