ग्वांगचोऊ (मराठी लेखनभेद: ग्वांगचौ ; चिनी: 广州 ; पीनयीन: Guangzhou ;), जुन्या काळातील अन्य नाव कांतोन (मराठी लेखनभेद: कॅंटोन ; रोमन लिपी: Canton ;) हे चिनी जनता-प्रजासत्ताकातील एक शहर असून ग्वांगदोंग प्रांताचे राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या मोती नदीच्या त्रिभुज प्रदेशात हॉंगकॉंगापासून १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
"अधिकृत संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2003-12-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
"क्वांगचौ पर्यटन विभागाचे संकेतस्थळ" (चिनी व इंग्लिश भाषेत). 2011-01-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-01-09 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!