कोगदे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
जव्हार बस स्थानकापासून नाशिक मार्गाने गेल्यावर पुढे झाप रस्त्याने गेल्यानंतर हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १ किमी अंतरावर आहे.
हवामान
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १७६ कुटुंबे राहतात. एकूण ८५५ लोकसंख्येपैकी ४२८ पुरुष तर ४२७ महिला आहेत. गावाची साक्षरता ५६.५१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६६.३९ आहे तर स्त्री साक्षरता ४६.५२ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १३३ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १५.५६ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.
नागरी सुविधा
गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्षा सुद्धा जव्हारपासून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
हातेरी, घिवंडे, विनवळ, पोयशेत, आल्याचीमेट, चंदगाव, अनंतनगर, आकरे, आयरे, शिवाजीनगर, गोरठण ही जवळपासची गावे आहेत.कोगदे ग्रामपंचायतीमध्ये अनंतनगर, चंद्रनगर, कोगदे ही गावे येतात.
कोगदे हे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात एक छोटेसे गाव आहे. गावची लोकसंख्या सुमारे २००० इतकी आहे.
इतर पाडे
1-अनंतनगर
2-चंद्रनगर
3-पाटीलपाडा
4- वकीचामाल
5-कूम माल
संदर्भ
१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३.
https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
४.
http://tourism.gov.in/
५.
http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
६.
https://palghar.gov.in/
७.
https://palghar.gov.in/tourism/
जिल्हा परिषद शाळा
त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा, कोगदे (क्रमांक १) ही शाळा आहे.या शाळेची पटसंख्या सुमारे २०० आहे.यात वारली व कोळी समाजातील अनेक विद्यार्थी आहेत. यात ७ शिक्षक आहेत. येथील काही गुणवंत मूळ आज विविध क्षेत्रात आपली कामगिरी बजावत आहेत .निसर्ग रम्य स्थळ. उंच कडे कपाऱ्यांमधे वसलेले छोटस गाव.