कातकरी महाराष्ट्रातील एक आदिवासी जमात आहे. कात तयार करणे हा जुन्या काळी कातकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. आणि त्यावरूनच त्यांना कातकरी हे नाव पडले. शिकार करणे, कोळसा बनवणे, जंगलातील लाकडे व मध गोळा करून विकणे असेही उद्योग हे लोक करतात. कातकरी लोक उत्तम शिकारी व तिरंदाजीत निष्णात असून हरणे, माकडे यांची शिकार करून त्यावर पोट भरतात. कातकरी लोक लहान लहान टोळ्या करून रानात राहतात व नेहमी वस्त्या बदलतात. त्यांच्या झोपडीत कायम एक शेकोटी पेटलेली असते तिला हे लोक परसा म्हणतात. रायगड जिल्ह्यात या लोकांची जास्त वस्ती असून तिथे त्यांच्या अनेक वाड्या आहेत. प्रत्येक वाडीचा एक नाईक किंवा पुढारी असतो. हे पुढारीपण वंशपरंपरेने चालते. नाईकाचे काम सामाजिक व धार्मिक प्रश्नांचा निवाडा देणे आणि अपराधाबद्दल दंड देण्याचे असते.
कातकरी जमातीत अथावर, धेड, सिधी, सोन व वरप असे पाच पोटविभाग असून त्यांच्यात लग्नसंबंध होत नाहीत. कातकरी जमातीत पूर्वीपासून विधवाविवाह रूढ आहे. या लोकात गांधर्वविवाहाची प्रथाही आहे. हे लोक विधीपूर्वक लग्न करतात.
कातकरी कुटुंबात स्त्रियांची हुकमत असते. या जमातीतील स्त्रिया गुंजाच्या माळा दागिने म्हणून घालतात. कानाच्या पाळ्यांना मोठी भोके पाडून त्यात त्या साखळ्याही घालतात.
कातकरी समाजात आताच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासात भर होत आहे. शैशानिक,राहणीमानात,समाजात वावरताना त्यांना नवीन काही तरी करायची अवशक्याता आहे.कातकरी जमात ही प्राचीन वन्य भागात राहणारी, जमात असून ,काही भागात ती अजून ही मागासलेली आहे ,शिक्षनापासून वंचित राहिलेली आहे. सह्याद्री पर्वत जसा नद्यांच्या प्रवाहाला दिशा बदलतो,तसाच ह्या जमातीत सह्याद्री पर्वत हा सह्याद्रीचा वरचा भाग म्हणजे घाटावर(दक्खन पठार),आणि सह्याद्रीचा खालचा भाग म्हणजे घाटाखाली(कोकण)असे यात बोलण्यात येत असते, घाटाखाली कोकण भागात म्हंटले तर,शहापूर, मुरबाड,खालापूर,जव्हार, धसई,कर्जत,नेरळ,रत्नागिरी,पनवेल,या भागात मोठ्या प्रमाणात कातकरी राहतात.आणि घाटावर पुणे भागात जुन्नर,(पाडली), आंबेगाव,घोडेगाव,ओतूर,भोर,तसेच पुण्यातील लोणावळा,या भागात देखील कातकरी समाज वावरताना दिसतो. राहणीमान अजून ही साधे असून, मोलमजुरी मासे पकडणे ते विकणे, जंगलात जाऊन मध काढणे,या घटकावराच त्यांचा उदरनिर्वाह चालतो,हा समाज इतका मागास आहे की आताच्या २१व्या शतकात देखील हा समाज सर्व घटकात मागास राहिलेला आहे,शिक्षण नाही,आणि शिक्षण घेतले तर नोकरी नाही,मग शिक्षण घेऊन पण जर नोकरी नाही,मग हा समाज पुन्हा आपल्या पिढ्या करतात तेच मोलमजुरी करतो,आणि आपले पोट भरतं असतो,शासन ह्या समाजातील मुलांना जे शिक्षण घेऊन पण वंचित राहिले त्या साठी योग्य कार्य करत नाही.नवीन उपक्रम नाही,या समाजात अजून देखील लोकांना घर नाही,अजून पण हा समाज झोपडी लाकडाची कुडांची पाला पाचोल्यानी बनऊन राहतो,त्यामुळे याकडे लक्ष्य देणं महत्त्वाची बाब आहे.देशाचा विकास हा इतर घटकांचा झाला आहे, परंतु बहुतेक समाज अजून देखील पूर्णतः अविकासितच आहेत.हा समाज आज जुन्याच परंपरा,रूढी,बाळगतो,जंगल,पाणी,सूर्य ह्यांना पुजनारा हा समाज जे प्रत्येक मनुष्याला जगण्यासाठी अती महत्त्वाचा घटक आहे त्याचा सांभाळ हा समाज करत आहे.परंतु त्यासाठी देखील ह्या समाजाला मोठी रक्कम मोजावी लागते,या येत्या काही वर्षात ही जात हा समाज जसा आज आहे जसा तो २०० वर्षापूर्वी होता तसाच तो पुढे ही राहील,त्यामुळे याकडे लक्ष देणं आणि या समाजाचं विकास महत्त्वाचा आहे .
लग्नविधी
कातकरी सोन लोकांचा लग्नविधी जातीतील एखादा धर्मशील मनुष्य करतो. त्याला गोतर्णी म्हणतात. नवरी मुलगी मंडपाच्या दारातच वराचे स्वागत करून त्याला माळ घालते. नंतर दोघांना समोरासमोर उभे करून मध्ये अंतरपाट धरतात. गोतर्णी एका घोंगडीवर अक्षता मांडतो व मध्ये पैसा ठेवून त्यावर हातातील सुपारी टाकतो. त्यानंतर नवरानवरी मंडपाभोवती पाच प्रदक्षिणा करून घोंगडीवर ठेवलेल्या अक्षतांना डोकी लावतात. एवढे झाल्यावर लग्नविधी पुरा होतो.
हे सुद्धा पहा
भटके कलावंत आणि भिक्षेकरी