कार्तिक मय्यपन

कार्तिक पलानियापन मयप्पन (८ ऑक्टोबर, २०००:चेन्नई, भारत - ) हा संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिरातीच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.

डिसेंबर २०१९ मध्ये, त्याला २०१९ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले. त्याने युएईसाठी ८ डिसेंबर २०१९ रोजी युनायटेड स्टेट्स विरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच महिन्यात, त्याला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या संघात स्थान देण्यात आले. डिसेंबर २०२० मध्ये, अमिराती क्रिकेट बोर्डाने वर्षभराच्या अर्धवेळ कराराने बहाल केलेल्या दहा क्रिकेटपटूंपैकी तो एक होता.

ऑक्टोबर २०२१ मध्ये, २०२१-२२ समर ट्वेंटी२० बॅश स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय टी२० संघात त्याची निवड करण्यात आली. त्याने ८ ऑक्टोबर २०२१ रोजी आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.[10]

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!