अहमदनगर जिल्ह्यातीलअकोले तालुक्यातील अत्यंत अवघड असा हा किल्ला आहे. घनदाट जंगल व विरळ वस्तीमुळे हा परिसर जरा त्रासदायक आहे. गडावर जाण्याच्या अवघड वाटा, भरपूर पाऊस यामुळे हा किल्ला तसा उपेक्षितच आहे. कळसूबाईच्या रांगेत असणारे अलंग, मदन आणि कुलंग हे तीन किल्ले लक्षवेधक आहेत.
इतिहास
अलंग गडाचा इतिहास कसा होता. इतिहास शोधण्याचे काम चालू आहे..... आणि या गडाचा इतिहास लवकरात लवकर आपणा सर्वं पुढे आण्याचा प्रयत्न करु.............. विशाल भवार .
घाटघर मार्गे: किल्ल्यावर जाण्यासाठी ही दुसरी वाट आहे. पहिली आंबेवाडी मार्गे आहे.
घोटी - भंडारदरा मार्गे घाटघरला जावे. तेथून अडीच तासात किल्ल्याच्या तिसऱ्या घळीत ठेवलेल्या लाकडी बेचक्यापाशी पोहचतो. या बेचक्यातून थोडे वर गेल्यावर सोपे प्रस्तरारोहण करावे लागले. पुढे थोडी सपाटी पार केल्यानंतर डावीकडे कड्यालगत जाणारी वाट पकडावी. १० - १५ मि. आपण किल्ल्यावरील गुहेत पोहचतो. खिंडीतून डावीकडील वाटेने पुढे गेल्यावर काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढून गेल्यावर ८० - ९० फुटाचा तुटलेला एक कडा लागतो. या कड्यावर प्रस्तरारोहणाचे साहित्य वापरून किल्ल्यावर प्रवेश करता येतो. मात्र, प्रस्तरारोहणाचे तंत्र अवगत असल्याशिवाय या वाटेने जाण्याचे धाडस करु नये. या वाटेने किल्ला गाठण्यास ६ तास लागतात.