२०१६ मधील अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक ही अमेरिकेचा ४६वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५८वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ८, इ.स. २०१६ रोजी घेण्यात आली. या निवडणुकांत डोनल्ड ट्रंपने हिलरी क्लिंटन विरुद्ध जिंकून राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. २०१६ च्या निवडणूकांत १ फेब्रुवारी, २०१६ या प्राथमिक निवडणूका सुरू होण्या दिवशी डेमॉक्रॅटिक पक्षाकडून तीन तर रिपब्लिकन पक्षाकडून बारा उमेदवार रिंगणात होते.