१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक

१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार बाद फेरी
यजमान संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती
विजेते पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान (१ वेळा)
सहभाग
सामने
मालिकावीर भारत सुनील गावसकर
सर्वात जास्त धावा भारत सुनील गावसकर (१६३)
सर्वात जास्त बळी पाकिस्तान वसिम अक्रम (७)
(नंतर) १९९०

१९८६ ऑस्ट्रेलेशिया चषक ही संयुक्त अरब अमिरातीस्थित क्रिकेट प्रशंसक अब्दुल रहमान बख्तीतार यांच्या मदतीने १० ते १८ एप्रिल १९८६ या कालावधीमध्ये संयुक्त अरब अमिरातीत झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा होती. ऑस्ट्रेलेशिया चषक मालिकेतील ही प्रथम आवृत्ती होती. ही स्पर्धा आशिया आणि ऑस्ट्रेलेशिया या खंडातील क्रिकेट खेळाणाऱ्या प्रमुख देशांसाठी भरवली गेली होती. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड या पाच देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांनी भाग घेतला. सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीच्या शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळविण्यात आले.

स्पर्धा बाद-फेरी पद्धतीने खेळविण्यात आली. १९८६ आशिया चषक जिंकल्याने श्रीलंका थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला. न्यू झीलंडने प्राथमिक फेरीचा सामना गमावला. भारताने न्यू झीलंडचा ३ गडी राखून पराभव केला. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने ८ गडी राखत सामना जिंकला. प्राथमिक फेरीच्या सामन्यात हरलेल्या संघांमध्ये अर्थात न्यू झीलंडने ऑस्ट्रेलियापेक्षा विरुद्ध संघाचे जास्ती गडी बाद केल्याने न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.

अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभूत करत उद्घाटनाचा ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकला. विजेत्या पाकिस्तान संघाला ४० हजार अमेरिकन डॉलरचे बक्षिस देण्यात आले. भारताच्या सुनील गावसकर यांना मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्राथमिक फेरी

१ला सामना

१० एप्रिल १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१३२/८ (४४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३४/७ (४१.४ षटके)
जेफ क्रोव ३६* (५६)
मनिंदरसिंग ३/२३ (९ षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: इवन चॅटफील्ड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • अज्ञात कारणामुळे सामना प्रत्येकी ४४ षटकांचा करण्यात आला.
  • संयुक्त अरब अमिरातीमध्ये न्यू झीलंडने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
  • चंद्रकांत पंडित (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

११ एप्रिल १९८६
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०२/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०६/२ (४९.१ षटके)
ग्रेग रिची ६०* (७२)
तौसीफ अहमद २/१९ (१० षटके)
मुदस्सर नझर ९५ (१४०)
रे ब्राइट १/२८ (१० षटके)
पाकिस्तान ८ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: मुदस्सर नझर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ऑस्ट्रेलियापेक्षा न्यू झीलंडने विरुद्ध संघाचे जास्त गडी केल्याने न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र.


उपांत्य फेरी

१ला उपांत्य सामना

१३ एप्रिल १९८६
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०५/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०६/७ (४९.१ षटके)
असंका गुरूसिन्हा ६८ (११३)
चेतन शर्मा ३/३५ (९ षटके)
सुनील गावसकर ७१ (१०९)
अशांत डिमेल ३/४० (१० षटके)
डॉन अनुरासिरी ३/४० (१० षटके)
भारत ३ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: सुनील गावसकर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.

२रा उपांत्य सामना

१५ एप्रिल १९८६
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
६४ (३५.५ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
६६/० (२२.४ षटके)
एव्हन ग्रे १७ (७५)
अब्दुल कादिर ४/९ (१० षटके)
पाकिस्तान १० गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: अब्दुल कादिर (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.

अंतिम सामना

१८ एप्रिल १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
२४५/७ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२४८/९ (५० षटके)
सुनील गावसकर ९२ (१३४)
वसिम अक्रम ३/४२ (१० षटके)
जावेद मियांदाद ११६* (११४)
चेतन शर्मा ३/५१ (९ षटके)
पाकिस्तान १ गडी राखून विजयी.
शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • पाकिस्तानने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलेशिया चषक जिंकला.


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!