२० फेब्रुवारी १९५० रोजी हिमालयन एव्हिएशन ने नेपाळहून गौचर (नेपाळ) ते कलकत्ता (सध्या कोलकाता) (भारत) पर्यंतची पहिली आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा सुरू केले.[१]
७ डिसेंबर १९५१ रोजी कराचीच्या स्टॉपओव्हर पॉईंटवर पाकिस्तानने अहमदाबादहूनकाबुल, अफगाणिस्तानकडे जाणाऱ्या हिमालयन एव्हिएशनच्या विमानाला स्थानबद्ध केले. पाकिस्तानने यापूर्वी उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत ओलांडणाऱ्या दिल्ली-काबुल थेट हवाई मार्गाचा वापर नाकारला होता. भारत आणि पाकिस्तानने पर्यायी अहमदाबाद-कराची- जाहेदान (इराण)-काबूल हा मार्ग ठरविला होता.[२]
सेवा
हिमालयीन एव्हिएशनची सनदी (चार्टर्ड) उड्डाणसेवे पासून सुरुवात झाली.[३] कालांतराने, ही सेवा नाईट-मेल सेवा आणि अनुसूचित प्रवासी उड्डाणां मध्ये विस्तारित झाले. जास्तीत जास्त महसूल मिळविण्यासाठी, त्यांनी त्यांच्या रात्रीच्या विमानातील उड्डाणांवरही प्रवाश्यांना नेण्यास सुरुवात केली.[४]