हिदेकी तोजो

हे जपानी नाव असून, आडनाव तोजो असे आहे.
हिदेकी तोजो

हिदेकी तोजो (देवनागरी लेखनभेद : हिदेकी टोजो; जपानी: 東條 英機 ;) (डिसेंबर ३०, इ.स. १८८४ - डिसेंबर २३, इ.स. १९४८) हा जपानाच्या सैन्यातील सेनापती व दुसऱ्या महायुद्धच्या कालखंडात जपानाचा ४०वा पंतप्रधान होता.

तोजो दुसऱ्या महायुद्धाच्या काळात (ऑक्टोबर १८, इ.स. १९४१ - जुलै २२, इ.स. १९४४) पंतप्रधानपदावर होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिका दोस्त राष्ट्रांच्या बाजूने उतरण्यासाठी निमित्त ठरलेल्या पर्ल हार्बरावरील हल्ल्यांसाठी काहीजण तोजोस जबाबदार धरतात. महायुद्ध संपल्यावर तोजोला युद्धगुन्हेगार म्हणून फाशी दिली गेली. मृत्यूपूर्वी तोजोने महायुद्धातील आपल्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारली व शांततेचा पुरस्कार केला.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!