हा लेख २००५मधील चक्रीवादळ हरिकेन स्टॅन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, चक्रीवादळ स्टॅन.
हरिकेन स्टॅन हे २००५ च्या अटलांटिक हरिकेन मोसमातील मोठे चक्रीवादळ होते. १-५ ऑक्टोबर, २००५ दरम्यान झालेल्या या वादळाने मध्य अमेरिकेतील देशांमध्ये प्रचंड नुकसान केले. या चक्रीवादळात १,६८८ व्यक्ती मृत्यू पावल्या व अंदाजे ४ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मालमत्तेचा नाश झाला.