स्कूबी डू किंवा स्कूबी-डू एक अमेरिकन रेखाचित्र आणि दूरचित्रवाणी मालिका आहे. यात फ्रेड जोन्स, डॅफ्ने ब्लेक, वेल्मा डिंकली आणि नॉर्व्हिल रॉजर्स तथा शॅगी हे चार टीनएजर[मराठी शब्द सुचवा] आणि त्यांचा स्कूबी-डू नावाचा ग्रेट डेन प्रकारचा कुत्रा रहस्ये उलगडतात. अमानवी प्राणी असलेली रहस्ये उलगडताना हे पाचही जण अनेक गोंधळ करतात परंतु शेवटी त्यांना नेहमी यश मिळते.
या मालिकेची सुरुवात इ.स. १९६९मध्ये स्कूबी-डू, व्हेर आर यू! या नावाने झाली. तेव्हापासून ही मालिका सतत प्रकाशित होत आहे. ज्यो रुबी आणि केन स्पियर्सने सुरुवातीस लेखन केलेली ही मालिका हॅना-बार्बेरा प्रॉडक्शन्स या संस्थेन प्रकाशित केली होती.