सेलू तालुका हा महाराष्ट्रामधीलपरभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे. येथील केशवराज बाबासाहेब मंदिर प्रसिद्ध आहे. बाबासाहेब महाराज सुभेदार होते. शिर्डीच्या साईबाबांचे ते गुरू होते. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हे तालुक्याच्या ठिकाणापासून २५ कि.मी. अंतरावर आहे. तसेच निम्न दुधना प्रकल्प तालुक्यात आहे. सेलू या गावचे मूळ नाव शाळूवाडी होते. या गावांमध्ये शाळू ज्वारीचे पीक जास्त येत असल्यामुळे हे नाव होते. नंतर शाळू वाडी अपभ्रंश होऊन सेलूवाडी हे नाव झाले व पुढे त्याचे सेलू हे नाव झाले.