सेलू हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याचे शहर आहे.
भौगोलिक स्थान
सेलू नगरंचायतीच्या स्थापन दिनांक 13/03/2015 ला झालेली आहे. सर्वात स्वच्छ शहर मानांकन व स्वच्छ सर्वक्षण मध्ये सलग सन 2018 ते 2022 या कालावधमध्ये दोनदा राष्ट्रपती च्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे.
हवामान
येथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात मोठा फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी पर्यंत असते.
लोकजीवन
या शहरामध्ये प्रामुख्याने तेली, पवार,कुणबी, माळी, महार, सुतार, माली, मुस्लिम या प्रामुख्याने जाती आहेत त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. कापूस पिके, केळी, सोयाबीन तूर हरभरा हे पिके घेतली जातात.
प्रेक्षणीय स्थळे
बोर व्याग्र प्रकल्प
बोर धरण
पंचाधारा धरण
नागरी सुविधा
जवळपासची गावे
घोराड, रेहकी, धानोली, कान्हापुर, गोंदापुर, वडगाव, गोंदापुर हे जवळील गावे आहेत
संदर्भ
- https://villageinfo.in/
- https://www.census2011.co.in/
- http://tourism.gov.in/
- https://www.incredibleindia.org/
- https://www.india.gov.in/topics/travel-tourism
- https://www.mapsofindia.com/