सुधीर कुमार चौधरी (गौतम) (जन्मः इ.स. १९८३मुझफ्फरपूर, बिहार, भारत) (काही बातम्यांमध्ये गौतम ह्या नावाने देखील उल्लेख होतो.) हा एक भारतीय क्रिकेट संघाचा खूप मोठा चाहता आहे.[१] तो जवळपास भारताच्या (भारतात खेळल्या जाणाऱ्या) प्रत्येक सामन्यात व ज्या सामन्यात सचिन तेंडुलकर खेळत असेल त्यात विशेषतः पहावयास मिळतो. त्याचे संपूर्ण शरीर भारतीय झेंड्याच्या तिरंग्या रंगात रंगविलेले असते, त्याच्या हातात भारताचा झेंडा असतो, तसेच अंगावर ठळक अक्षरात १० हा आकडा व तेंडुलकर असे रोमन लिपीत लिहीलेले असते. त्याच्या सांगण्यानुसार तो सचिन तेंडुलकर ह्यांचा सर्वात मोठा चाहता असून त्यास प्रत्येक सामन्यासाठी लागणाऱ्या तिकिटाचा खर्च सचिन कडून पुरविला जातो. तो सहसा सामन्यादरम्यान दूरदर्शन वर दाखविला जातो, सध्या (आयपीएल २०१०) तो सचिन तेंडुलकर खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाच्या प्रत्येक सामन्यात पहावयास मिळतो.