हा लेख अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील सान हुआन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सान हुआन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
सान हुआन काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडोराज्यातील ६४ काउंटींपैकी एक आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७०५ असून [१] ही कॉलोराडोतील सर्वात कमी लोकसंख्या असलेली काउंटी आहे. सिल्व्हर्टन येथील प्रशासकीय केन्द्र आणि एकमेव शहर आहे. [२] या काउंटीला या प्रदेशातील पर्वतरांगेचे नाव दिले आहे. सान हुआन काउंटीची सरासरी उंजी ३,४२६ मी (११,२४० फूट) असून ही अमेरिकेतील सर्वाधिक उंचीवर असलेली काउंटी आहे.