सांता बार्बरा रेल्वे स्थानक अमेरिकेच्या कॅलिफॉर्नियामधील सांता बार्बरा शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक सान डियेगो-लॉस एंजेलस-सान होजे-पोर्टलँड-सिअॅटल रेल्वेमार्गावर आहे. कोस्ट स्टारलाईट आणि पॅसिफिक सर्फलायनर या दोन रेल्वे गाड्या येथे थांबतात. कोस्ट स्टारलाइट लस एंजेलस आणि सिअॅटल दरम्यान रोज एकदा धावते तरपॅसिफिक सर्फलायनरसान डिएगो आणि गोलेटा या सांता बार्बराच्या उपनगरादरम्यान दररोज प्रत्येक दिशेने पाच वेळा धावतात. त्यांपैकी दोन उत्तरेकडे सान लुईस ओबिस्पोपर्यंत जातात.
सांता सांता बार्बरा रेल्वे स्थानकावर तिकीटविक्री आणि सामान चढविण्या-उतरविण्यासाठी कर्मचारी उपलब्ध असतात..
कॅलिफोर्निया मधील ७४ अॅमट्रॅक स्थानकांपैकी, सांता बार्बरा हे १५वे सर्वात व्यस्त स्थानक होते (२०१२). दररोज सरासरी ८३४ प्रवासी येथून ये-जा करतात. या वर्षी एकूण ३,०४,३८२ प्रवासी या स्थानकात आले-गेले. [१]