सलमान खान, जन्मनाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान, (हिंदी: सलमान ख़ान ; उर्दू: عبد الرشید سلیم سلمان خان ; २७ डिसेंबर, इ.स. १९६५ ) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.-
व्यक्तिगत माहिती
सलमान खानाने इ.स. १९८८ साली बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. इ.स. १९८९ साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले व त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार त्याला मिळवून दिला. त्यानंतर साजन (इ.स. १९९१), हम आपके हैं कौन..! (इ.स. १९९४), करण अर्जुन (इ.स. १९९५), जुडवा (इ.स. १९९७), प्यार किया तो डरना क्या (इ.स. १९९८) व बीवी नं. १ (इ.स. १९९९) या इ.स.१९९० च्या दशकात गाजलेल्या चित्रपटांत त्याने अभिनय केला.
१९९९ मध्ये सलमान खानला अतिथि-भूमिका साठी, १९९८ मधील कुछ कुछ होता है ह्या सिनेमा साठी फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील पटकथालेखक सलीम खान हे त्याचे वडील असून अरबाझ खान, सोहेल खान हे त्याचे भाऊ आणि बहीणअर्पपित असे आहेत.२०११ मध्ये त्याने स्वता:ची निर्माण कंपनी काढली.ते कंपनीचे नाव (SKBH Productions) सलमान खान बीइंग प्रोडकशन आहे. निर्माता म्हणून चिल्लर पार्टी हा सलमान खानचा पहिला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाला ३ राष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित केले आहे. त्याला अनेक नावाने ओळखले जाते "दबंगखान", "टायगर खान", भाईजान","सलमान भाई',भॉय इत्यादी.
चित्रपट कारकीर्द
पदार्पण आणि सफलता (१९८९-९३):
सलमानने आपल्या अभिनयाची सुरुवात १९८८ मध्ये सहायक अभिनेता म्हणुन 'बिवी हो तो ऐसि'या चित्रपतटातुन केली.सुरज बरजात्या यांच्या 'मैने प्यार किया'(१९८९)हा सलमानचा प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट होता.या साठी त्याला 'फिल्मफेर सर्वोत्कृष्ट अभिनेता'चे नामांकन मिळाले होते.
चित्रपट
बाह्य दुवे
संदर्भ