सकाळ इंडिया फाऊंडेशन ही सकाळ वृत्तपत्र समूहाने स्थापन केलेली सामाजिक संस्था आहे. [१] सकाळ वृत्तपत्राचे तत्कालीन व्यवस्थापकीय संपादक, नानासाहेब परुळेकर यांच्या पुढाकाराने १९५९ साली, संस्थेची सुरुवात,इंडिया फाउंडेशन या नावाने १९५९ साली करण्यात आली होती. [२] ही एक धर्मादाय शैक्षणिक न्यास आहे. त्यानंतर २००३ साली संस्थेचे सकाळ इंडिया फाऊंडेशन असे नामांतरण करण्यात आले. फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना देशांतर्गत अथवा परदेशातील उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते. याव्यतिरिक्त फाउंडेशन तर्फे गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी,माध्यमिक शालेय विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येते. [३]