शिवाजी गणेशन

शिवाजी गणेशन
(சிவாஜி கணேசன்)
सिवाजी गणेसन
जन्म विळुप्पुरम चिन्नैयापिळ्ळै गणेसन
ऑक्टोबर १, १९२७
सिरकाळी, तमिळनाडू, भारत
मृत्यू जुलै २१, २००१
चेन्नई
इतर नावे नाडिगर तिलगम्
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट
भाषा तमिळ
पत्नी कमला गणेशन

शिवाजी गणेशन (तमिळ : சிவாஜி கணேசன், उच्चार : सिवाजी गणेसन, पूर्ण नाव : विळुप्पुरम चिन्नैयापिळ्ळै मन्ड्रयार गणेसन) हे एक प्रसिद्ध तमिळ अभिनेते होते. त्यांना भारतीय चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.

चित्रपटात येण्यापूर्वी ते तमिळ नाटक "सिवाजी कांड इंद राज्यम" ह्या नाटकात प्रमुख भूमिकेत काम करित असत. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर आधारीत एक तमिळ नाटक होते आणि या भूमिकेवरून त्यांची ओळख "सिवाजी गणेसन" अशी पडली.[]

शिवाजी गणेशन वरील पोस्टाचे तिकीट

संदर्भ

  1. ^ "Sivaji: The curtain drops" (इंग्रजी भाषेत). २७ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!