शाहीर प्रभाकर

प्रभाकर जनार्दन दातार (जन्म : गंगापूर (नाशिक जिल्हा-महाराष्ट्र, इ.स. १७५५; - इ.स. १८४३) हा मराठी लावणीकार होता.

तो मुरुड या गावचा राहणारा. त्याने पेशवाईचा उत्कर्ष आणि अपकर्ष दोन्हीही पाहिले. २०-२२ व्या वर्षी तो पुण्यात दाखल झाला व नंतर गंगू हैबतीच्या फडात प्रभाकरच्या कवनांनी तो काळ गाजविला त्याच्या कवनांत उत्तान श्रुंगार आढळतो. या कवनांचा संग्रह १९२०मधे प्रसिद्ध झाला. त्याने एकूण १३ पोवाडे व ११९ लावण्या लिहिल्या. माधवराव पेशवे यांचा 'रंग' आणि त्यांचा 'मृत्यू' यासंबधीचे त्याचे पोवाडे प्रसिद्ध आहेत. त्याचा सवाई माधवरावांचा पोवाडा करुणरसाचा उत्कट अविष्कार करतो.

शाहीर प्रभाकरवरील मराठी पुस्तके

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!