सर विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल (जन्म : १७ ऑगस्ट १९३२; - लंडन, ११ ऑगस्ट २०१८) हे व्ही. एस. नायपॉल अशा नावाने ओळखले जात. त्यांना इ.स. २००१ सालचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. इ.स. १९९० साली इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांना सर ही पदवी बहाल केली. इ.स. १९७१ साली त्यांना बुकर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.