| या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शनहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
क्रांतिविर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे कला वाणिज्य महाविद्यालय इ.स. २००१ मध्ये सुरू झाले.[१]
संस्थेचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात अनेक गुणवत्तापूर्ण उपक्रमांचे आयोजन केले. प्लेसमेंट सेलच्या वतीने जिल्हा कौशल्य व रोजगार केंद्र या महाराष्ट्र या शासनाच्या विभागाच्या वतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी सोफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वर्षी महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण व लिंग समानता या विषयावरील कार्यशाळा आयोजित केली. या शैक्षणिक वर्षात प्राध्यापकांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल्स मध्ये लेख प्रकाशित करून महाविद्यालयाचा संशोधन आलेख उंचावला आहे. अध्यापकांइतकाच प्रशासकीय सेवकांची भूमिका महत्त्वाची असल्याने महविद्यालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालय व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळा आयोजित करून प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षणातील प्राध्यापक , विद्यार्थी, प्रशासकीय सेवक यांच्या बरोबरीनेच माजी विद्यार्थी व पालक या सर्व घटकांशी उत्तम समन्वय व सांघिक भावनेने काम करून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवून या क्षेत्रात सुद्धा रचनात्मक काम करण्यात महाविद्यालयाचा नेहमीच पुढकार होता . ग्राम स्वच्छता, पर्यावरण जनजागृती, रस्ता सुरक्षा, एड्स जनजागृती, वृक्षारोपण, स्त्रीभ्रूणहत्या इ. विषयावर प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होवून महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांनी समाजाप्रती असलेली उत्तरदायित्वाची भावना नेहमीच जपलेली आहे.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत सभागी करून त्यांचे शिक्षण खंडित होणार नाही यासाठी विद्यार्थी विकास मंडळ विद्यार्थ्यांचा सन्मान राखला जाईल असे काम देऊन त्यांना योग्य आर्थिक मोबदला मिळवून देण्यास कार्यरत आहे.विद्यार्थ्यांमध्ये वाचन-लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथप्रदर्शन, ज्ञानविज्ञान वाचन चळवळीच्या माध्यमातून व्याख्याने , काव्यवाचन , निबंध लेखन या सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळवून देण्याचा अविरत प्रयत्न महाविद्यालयातील अध्यापकवर्ग करत आहे. अविष्कार सारख्या संशोधनास प्रेरणा देणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक नेहमीच पुढाकार घेतात . माजी विद्यार्थ्यांचा मेळावा व पालक सभांच्या आयोजनाच्या माध्यमातून शिक्षणाशी संबंधित विविध घटकांशी समन्वय साधून अध्ययन अध्यापनाबरोबरच विद्यार्थीहिताच्या योजनांची चर्चा या घटकांसोबत केली जाते व त्यांच्या सुचनानांचा योग्य सन्मान केला जातो.
वाणिज्य शाखा आयोजित कॉमर्स फेस्टिवल, उद्योजकता कार्यशाळा, व जीएसटी विषयावरील कार्यशाळा ,बँकां व कंपन्यांना अभ्यास भेटी असतील यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांद्वारे अध्यापन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न महाविद्यालय पातळीवर होतो ही कौतुकास्पद गोष्ट आहे .दृकश्राव्य माध्यमातून साहित्याकृतीवरील ध्वनीफिती व सामाजिक किंवा आर्थिक विषयावरील डॉक्युमेंटरी इ. माध्यमांतून विद्यार्थ्यांना अधिक प्रगल्भ करण्याचा प्रयत्न व जगात आपल्या विषयात घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत अद्यावत ठेवण्याचे काम महाविद्यालयातील अध्यापक अत्यंत तन्मयतेने करत आहे.
सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते . या जाणिवेतूनच सामाजिक सलोखा, स्त्री-पुरुष समानता, मानवी हक्क, पर्यावरण जनजागृती , धर्मनिरपेक्षता , लोकशाही मूल्य ,समता व न्याय या बद्दल विद्यार्थ्यांमध्ये चांगली समज व जाणीव निर्माण करण्यासाठी समाजातील व विविध नामवंत शैक्षणिक संस्थांमधील मान्यवरांना निमंत्रित करून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन घडवून आणण्यासाठी या वर्षात महाविद्यालयाने विशेष प्रयत्न केले आहेत .
समाजातील सर्वाना शिक्षणाची उपलब्धता (access) , समानता (equity), गुणवत्ता (quality) , आणि प्रतीभासपन्नतेसाठी शिक्षण ( promotion of talent) या चतुसुत्रीला अनुसरून महाविद्यालयाची वाटचाल सुरू असून भविष्यात अजून गुणवत्तेचा आलेख वाढवून शिक्षणाला व्यवसायाभिमुख व रोजगाराभिमुख करण्यासाठी महाविद्यालयातील प्रत्येक घटक सांघिक भावनेने काम करून सक्रीय राहील याची खात्री वाटते.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Arts & Commerce College, Dindori". bcud.unipune.ac.in. 2019-01-10 रोजी पाहिले.