वेस्ट इंडीज क्रिकेट संघ एप्रिल २०१८ मध्ये ३ टी२० सामन्यांची मालिका खेळण्याकरिता पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. झिम्बाब्वेने २०१५ मध्ये पाकिस्तानचा दौरा केल्यानंतर प्रथमच दुसरा कसोटी संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. याआधी श्रीलंकेने ऑक्टोबर २०१७ला पाकिस्तानविरूद्ध लाहोरमध्ये एक टी२० सामना खेळला होता.
योजनेनुसार सदर मालिका नोव्हेंबर २०१७ मध्ये होणार होती पण वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव दौरा करण्यास नकार दिला. पीसीबीचे अध्यक्ष नजाम सेथी यांनी हा दौरा एप्रिल २०१८ मध्ये होणार असल्याचे जाहीर केले. सामने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर होतील. कराचीत शेवटचा सामना २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध झाला होता ज्या दौऱ्यात श्रीलंका क्रिकेट संघावर अतिरेकी हल्ला झाला होता आणि सदर दौरा रद्द करावा लागला.
क्रिकेट वेस्ट इंडीजने पाकिस्तानला जाण्याकरता खेळाडूंना अधिक भत्ता देऊ केला. दौऱ्यापुर्वी वेस्ट इंडीजने कमकुवत संघाची घोषणा केली. मुख्य कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने दौऱ्यास सुरक्षेचे कारण सांगून जाण्याच नकार दिला. उपकर्णधार जेसन मोहम्मदला कर्णधार बनवून पाठविण्यात आले.
संघ
टी२० मालिका
१ला टी२० सामना
२रा टी२० सामना
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : ओडियन स्मिथ (विं)
- ह्या पाकिस्तानचा टी२०तील सर्वाधीक धावा.
३रा टी२० सामना