वृंदा घनश्याम राठी (जन्म १४ फेब्रुवारी १९८९) ही भारतीय क्रिकेट पंच आहे.[१] ती सध्या आयसीसी पंचांच्या विकास पॅनेलची सदस्य आहे.[२][३][४] जानेवारी २०२३ मध्ये, २०२३ च्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील सामन्यांमध्ये उभे राहण्यासाठी आयसीसी ने नामांकित केलेल्या महिला पंचांपैकी ती एक होती.[५][६]
१० जानेवारी २०२३ रोजी, नारायणन जननी सोबत ती २०२२-२३ रणजी मध्ये गोवा आणि पाँडेचेरी यांच्यातील सामन्यात पंचांपैकी एक असताना, भारतातील पुरुषांच्या देशांतर्गत सामन्यात मैदानी पंच म्हणून उभ्या राहिलेल्या पहिल्या महिला पंच बनल्या.[७]
संदर्भ