विलार्ड फ्रँक लिबी (१७ डिसेंबर, इ.स. १९०८:ग्रँड व्हॅली, कॉलोराडो, अमेरिका − ८ सप्टेंबर, इ.स. १९८०, लॉस एंजेल्स) हे एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व १९६० सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते होते. येथे झाला . त्यांच्या वडिलांचे नाव ओरा एडवर्ड लीब्बी व आईचे नाव एव्हा मे असे होते. त्यांना एल्मर आणि रेमंड नावाचे भाऊ, तसेच एव्हा आणि एव्हलिन नावाच्या बहिणी होत्या. ते पाच वर्षांचे असताना आपल्या पालकांसोबत सांता रोसा, कॅलिफोर्निया येथे आले . त्यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात एका २ खोलीच्या शाळेतून केली. त्यांनी अनली हायस्कूल येथून १९२६ साली पदवी प्राप्त केली .
१९२७ साली त्यांनी बर्क्ली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला. इथेच त्यांनी १९३१ साली बी.एस. व १९३३ मध्ये पीएचडी पदव्या मिळवल्या. लिबी यांची १९३३ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापिठातील रसायनशास्त्र विभागात शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १९३८ मध्ये सहायक अध्यापक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९४० मध्ये ते लिओनोर हिकी हिच्याशी विवाहबद्ध झाले. १९४१ साली त्यांना गुगनहाइम फेलोशिप मिळाली.
त्यांनी प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांवरून त्यांचा काळ ओळखण्याची कार्बन १४ पद्धत शोधून काढली. हा शोध पुरातत्त्व विभागासाठी क्रांतिकारक ठरला. १९४६ साली त्यांनी हा शोधनिबंध प्रकाशित केला. त्यांच्या रसायनशास्त्रातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना १९६० मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.
बाह्य दुवे