प्रा. विमल वाणी, एम.ए. बी.एड. या मराठी लेखिका आणि कवयित्री आहेत. यांनी महाविद्यालयात मराठी भाषा आणि मानसशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. त्यांनी १५ लघुकथासंग्रह लिहिले. त्या प्राध्यापिकापदावरून निवृत्त होउव म्हसावद या गावी राहतात.
पुस्तके
- आत्याबाईच्या मिशा (बालसाहित्य)
- कानोड जागर (कवितासंग्रह)
- कुंपण (कथासंग्रह)
- कोंडमारा (कादंबरी)
- कोल्हाटणीचे पोर (कथासंग्रह)
- खट्याळ कान्हा (गवळणीसंग्रह)
- खानदेशी मेवा (कवितासंग्रह)
- जिद्द (कथासंग्रह)
- जीवनसंघर्ष (आत्मचरित्र)
- डोहाळे गीत (गीत संग्रह)
- तेजोकिरण (सदरलेखन/व्याख्यानसंग्रह)
- न्याय (कादंबरी)
- भक्तिसुमने (कवितासंग्रह)
- भरारी (कवितासंग्रह)
- भारूड खजिना (गीतसंग्रह)
- भावगीतं (गीतसंग्रह)
- मुलांसाठी मजेदार गोष्टी (४ पुस्तकांचा संच)
- रमणीय निसर्ग
- रानजाई (कवितासंग्रह)
- रानमेवा (कथा)
- लावणी ठसक्याची (कवितासंग्रह)
- लोकगीतं (गीतसंग्रह)
- विठूचा गजर (भक्तिगीते)
- विमलिनी (कवितासंग्रह)
- शापित वंश (गूढ कथा)
- श्रीकृष्णलीलामृत
- श्रीकृष्णाच्या गोष्टी (बालसाहित्य)
- संगम (कवितासंग्रह)
- संत चरित्र संच (कान्होपात्रा, बहिणाबाई, मीराबाई, मुक्ताबाई आणि सावता माळी यांची चरित्रे)
- संत बहिणाबाई (चरित्र)
- सपन
- संस्कार (कथा)
- क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले (कादंबरी)
- सूड (कादंबरी)
- स्त्री संतांच्या गोष्टी (कथा)
सन्मान
- प्रा. विमल वाणी या पिंपरी(पुणे) येथील स्वानंद महिला संस्था व भारतीय जैन संघटना यांच्या तर्फे फेब्रुवारी २०१४मध्ये घेण्यात आलेल्या ११व्या स्त्री साहित्य कला संमेलनाच्या अध्यक्षा होत्या.