श्रीअरविंद आणि श्रीमाताजी, पाँडिचेरी यांच्या साहित्याचे मराठीत भाषांतर करणाऱ्या अनुवादिका, संजीवन या मराठी मासिकाच्या संपादिका म्हणून ओळखल्या जातात. श्रीअरविंद आश्रमात येणाऱ्या मराठी लोकांसाठी मार्गदर्शक होत्या.
जीवन
इ.स. १९५४ साली त्या श्रीअरविंद आश्रमात दाखल झाल्या. तेथील वास्तव्यात त्या फ्रेंच भाषा शिकल्या. पुढे श्रीमाताजींच्या फ्रेंच मधील संभाषणाचे त्यांनी मराठीमध्ये अनुवाद केले.
कार्य
इ.स. १९५० पासून पाँडिचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या संजीवन संजीवन मासिकाच्या त्या संस्थापक होत्या. श्री.भा.द.लिमये हे अन्य संस्थापक होते. संजीवन मासिकाच्या स्थापनेपासून श्री.लिमये हे संपादक म्हणून कार्यरत होते. त्यांच्यानंतर म्हणजे २००५ पासून पुढे २०१० पर्यंत विमल भिडे या संपादिका म्हणूनही कार्यरत होत्या. [१]
श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याचा मराठीमध्ये अनुवाद करून श्रीअरविंद व श्रीमाताजी यांचे साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचविले.
सेनापती बापट यांनी श्रीअरविंद लिखित ग्रंथांचे दिव्य जीवन, योगसमन्वय या नावानी जे मराठी अनुवाद केले होते, त्याच्या संपादनाच्या कामी त्यांना श्री.लिमये व श्रीमती विमल भिडे यांचे मोठे साहाय्य लाभले होते.[२]
आश्रमात दाखल होण्यापूर्वीच्या कालावधीत त्यांनी शिक्षिका या नात्याने केलेल्या कामाबद्दल त्यांना 'आदर्श माता पुरस्कार' मिळालेला होता.
पाँडिचेरी येथे 'महाराष्ट्र निवासा'ची स्थापना करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता.[३]
उत्तम हस्ताक्षर असल्याने आश्रमातील फलक-लेखनाचे काम त्यांच्यावर सोपविण्यात येत असे.
त्यांच्याकडे काव्य-लेखन कौशल्यही होते.
त्या गायिका म्हणूनही प्रसिद्ध होत्या. श्री.पुजालाल आणि श्री.कपाली शास्त्री यांच्या हिंदी व संस्कृत काव्यरचनांना चाली लावून त्यांचे गायन त्यांनी केले होते. त्याच्या रेकॉर्ड्स प्रकाशित करण्यात आल्या होत्या.[४]
लेखन व अनुवाद
संकलित पुस्तके
स्फूर्ति-कथा, प्रकाशक - संजीवन कार्यालय, प्रथम आवृत्ती १९९८, ISBN 81-7058-515-5
अनुवादित पुस्तके
प्रार्थना आणि ध्यान (ले.श्रीमाताजी) अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, पहिली आवृत्ती १९६९, ISBN 978-81-7058-241-0
श्रीअरविंदांची जीवनकथा, (द स्टोरी ऑफ हिज लाईफ, ले.तेहमी) अनुवाद - विमल भिडे, प्रथम आवृत्ती १९७५, आठवे पुनर्मुद्रण २००५, ISBN 81-7058-139-7
आदर्श बालक - (आयडियल चाइल्ड, ले.श्रीमाताजी) प्रकाशक - श्रीअरविंद सोसायटी, द्वितीय आवृत्ती - १९७८
शिक्षण - भाग ०१, अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ऑक्टोबर १९८०
माता - (श्रीअरविंद लिखित द मदर) अनुवाद - भा.द.लिमये, विमल भिडे, प्रथम आवृत्ती १९८१
चार तपस्या चार मुक्ती - (द फोर ऑस्टेरीटीज अँड द फोर लिब्रेशन्स, ले.श्रीमाताजी) अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, तृतीय आवृत्ती १९८३[५]
श्रीमाताजींची आणि श्रीअरविंदांची उत्तरे, (कलेक्टेड वर्क्स ऑफ द मदर, खंड १६, ले.श्रीमाताजी) प्रथम आवृत्ती १९८४, प्रकाशक - श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ISBN 979-81-7058-022-4
शिक्षण - भाग ०२, अनुवाद - विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, एप्रिल १९८४
योगाची मूलतत्त्वे, (एलेमेंट्स ऑफ योगा, ले.श्रीअरविंद), अनुवाद - विमल भिडे, प्रथम आवृत्ती १९८५, प्रकाशक - श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ISBN 978-81-7058-972-3
श्रीमातृदर्शन (श्रीमाताजींचे चरित्र आणि विविध आठवणी),[६] (मदर्स बायोग्राफी अँड रेमिनीसेन्स या पुस्तकाचा अनुवाद), प्रथम आवृत्ती १९८८, प्रकाशक - श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ISBN 81-7058-703-4
मातेचे चार आविष्कार (श्रीअरविंद लिखित 'द मदर' या ग्रंथावर आधारित ओवीबद्ध भावानुवाद) संजीवन कार्यालय
श्रीमाताजींची प्रवचने (१९३०-१९३१) अनुवाद - भा.द.लिमये व विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, ऑगस्ट १९९०, ISBN 81-7058-211-3
विचारशलाका, अनुवाद - भा.द.लिमये व विमल भिडे, संजीवन कार्यालय, श्रीअरविंद आश्रम ट्रस्ट, पाचवी आवृत्ती १९९९, ISBN 81-7058-224-5