विद्या सुर्वे बोरसे

साचा:विद्या सुर्वे बोरसे
जन्म ०५ जानेवारी १९८१
धुळे
राष्ट्रीयत्व भारतीय
साहित्य प्रकार बाल साहित्य, भाषांतर, समीक्षा
विषय मराठी साहित्य
प्रसिद्ध साहित्यकृती बालसाहित्यः आकलन आणि समीक्षा
वडील फकीरा सुर्वे
आई शकुंतला
पती डॉ. सुभाष बोरसे
अपत्ये वेदांत, आदित्यराज

विद्या सुर्वे बोरसे (५ जानेवारी, १९८१ - ) या मराठी लेखिका आहेत. बाल साहित्य, भाषांतर, अनुवाद, समीक्षा या क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. नाशिक येथील लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालयात त्या मराठी विभाग प्रमुख आहेत, तसेच महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्या धुळे जिल्हा येथील वेल्हाणे देवाचे या गावच्या त्या सरपंच आहेत.

ग्रंथसंपदा

बालसाहित्यः आकलन आणि समीक्षा

होय तेव्हाही गाणे असेल! (कवितासंग्रह)

कोरा कागद निळी शाई

इनसायडर 2 ग्रंथात त मराठी कविता व इंग्रजी अनुवाद समाविष्ट.

●बालसाहित्य समीक्षक, भाषांतरकार ही महाराष्ट्रात असलेली ओळख.

●नाशिक मधील  लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणुन कार्यरत.

●'बालसाहित्य: आकलन आणि समीक्षा' हा समीक्षाग्रंथ प्रकाशित. या ग्रंथाला विविध संस्थांचे चार राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.

●ऊपक्रमशिल आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक ही विशेष ओळख. मागील दहा वर्षापासून महाविद्यालयात अध्यापनकार्य. सुरुवातीला चांदवड येथे बीए आणि एमए च्या वर्गांना अध्यापन केले. त्यानंतर मालेगाव व नाशिक येथील महाविद्यालयात अध्यापन.

●अध्यक्ष,महात्मा गांधी विद्यामंदिर मराठी अभ्यास मंडळ.

●’मराठी नवकादंबरीचा चिकित्सक अभ्यास’ ह्या संशोधन विषयावर कवी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची विद्यावाचस्पती  (पीएचडी )पदवी प्रदान.

●E-Learning based hybrid training for education and management system. ह्या विषयावर भारत सरकारचे पेटंट मिळाले आहे.

●अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तसेच साहित्य अकादमी, विद्यापीठ अनुदान आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित विविध आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये अध्यक्ष, निमंत्रित शोधनिबंध वाचक म्हणून सहभाग व मार्गदर्शन.

● ९४ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिक येथे परिसंवादास निमंत्रण व व्याख्यान .

● ९५ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन उदगीर येथे परिसंवादास निमंत्रण व व्याख्यान .

●९७ व्या आखील भारतीय साहित्य संमेलन अमळनेर येथे परिसंवादात निमंत्रित व्याख्याते.

● पहिले राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन ‘आई प्रतिष्ठान’ मालेगाव येथे परिसंवादास निमंत्रण व व्याख्यान.

●मराठवाडा साहित्य परिषद आयोजित पहिले बालकुमार साहित्य संमेलन पैठण येथे परिसंवादात निमंत्रित व्याखाती.

●नाशिक येथील ९४व्या व अमळनेर येथील ९७व्या आखील भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मरनिकेत लेख प्रकाशित.

● महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई शासन मान्य ग्रंथ सूचीमध्ये ‘बालसाहित्य : आकलन आणि समीक्षा’ व ‘होय तेव्हाही गाणं असेल’ या ग्रंथांचा समावेश.

●महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, देशदूत, लोकमत, आपलं महानगर या वर्तमान पत्रातून लेखन प्रकाशित.

●महाराष्ट्र शासन, बालभारती च्या 'किशोर' या मासिकात 'वाचनानंद'  हे विद्यार्थी वाचकप्रिय सदर लिहीले.

●राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकांमधून पंचवीस पेक्षा अधिक संशोधनपर निबंध प्रकाशित.

●'काव्याग्रह' या नियतकालिकाच्या संपादक मंडळाच्या सदस्य होत्या. हे नियतकालिक मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती भाषेत प्रकाशित होत असे.

●दैनिक उद्याचा मराठवाडा या वृत्तपत्रात 2016 ह्या वर्षासाठी बालसाहित्यपर लेखमाला.

●2019 ला दैनिक सकाळ मध्ये 'बालजगत' हे साप्ताहिक सदर वर्षभर प्रकाशित.

●दैनिक आपले महानगर रविवार पुरवणी  साठी समीक्षापर सदर लेखन वर्ष 2019

●2020 ला दैनिक सकाळच्या सप्तरंग ह्या रविवार पुरवणीत 'बालगुज' हे  साप्ताहिक सदर लिहिले.

●'होय, तेव्हाही गाणे असेल!' हा ब्रेख्तच्या कवितांचा अनुवाद अथर्व प्रकाशन जळगाव यांनी प्रकाशित केला आहे. 

●मातोश्री स्नेहप्रभा तौर कृतज्ञता बालसाहित्य पुरस्कार.          

●ह्या पुस्तकास भाषांतरासाठीचा नरेंद्र मारवाडे स्मृती साहित्य पुरस्कार .

●कादवा शिवार चा राज्यसस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

●साहित्य अकादमी चा भाषांतराचा प्रकल्प मिळाला आहे.

●विविध विद्यापीठातील (मुंबई विद्यापीठ व स्वा.रा.तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)  अभ्यासक्रमात 'बालसाहित्य आकलन आणि समीक्षा' व 'होय तेव्हाही गाणे असेल' कोरा कागद निळी शाई या ग्रंथांचा क्रमिक व संदर्भ ग्रंथ म्हणून समावेश.

●महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा उत्कृष्ट समीक्षालेखासाठीचा 'ताईसाहेब कदम  पुरस्कार.'

●आदर्श सरपंच राज्यस्तरीय पुरस्कार 2022.

● राज्य शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण बाल वाङ्मय पुरस्कार कोरा कागद निळी शाई ह्या पुस्तकासाठी जाहीर  वर्ष 2022.

●यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले  अध्यासनाचा कार्यकर्तृत्व पुरस्कार वर्ष 2022.

●अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचा लीलावती भागवत समीक्षा पुरस्कार.

●महात्मा गांधी विद्यामंदिर तर्फे पेटंट साठी पुरस्कार.

●दै आपलं महानगर च्या रविवार पुरवणीत साहित्य समीक्षेचे सदर लिहिले २०१९.

●कविता, लेख  व अनुवाद महाराष्ट्रातील मान्यवर दिवाळी अंकात व नियतकालिकांतून प्रसिद्ध.

●'आईना' या टोपणनावाने कवितालेखन.

●मातोश्री स्नेहप्रभा तौर कृतज्ञता बालसाहित्य ●महाराष्ट्र राज्य मराठी वाड्मय पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून कार्य.

● आई प्रतिष्ठान राज्यस्तरीय मराठी वाड्मय पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून कार्य

●पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार च्या कविता लेखन स्पर्धेच्या परीक्षक.                             

●टाटा ट्रस्ट च्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेच्या परिक्षक म्हणून कार्य.

●डिसेंबर २०२१ मध्ये 'कोरा कागद निळी शाई' हा बालसाहित्य समीक्षा ग्रंथ प्रकाशित.

●लोकमत न्यूज18 गौरव महाराष्ट्राचा पुरस्कारासाठी चे नामांकन.

साहित्य अकॅडमी च्या पुरस्कारासाठी बालसाहित्य:आकलन व समीक्षा या ग्रंथासाठी नामांकन. वर्ष 2021

●कृत्या इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवल च्या सल्लागार मंडळ सदस्य आणि वर्ल्ड पोएट्री मुव्हमेंट च्या मराठी भाषेच्या समन्वयक.

●' इन्सायडर २ 'या पुस्तकात पाच कवितांचे इंग्रजी अनुवाद समाविष्ट.

● मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुक्त सृजन साहित्य पत्रिका आयोजित कवयित्री संमेलनास निमंत्रित कवी म्हणून सहभाग.

● सार्वजनिक वाचनालय नाशिक येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान

● रिसर्च जर्नी या आंतरराष्ट्रीय  बहुविद्याशाखीय जर्नल वर संपादन मंडळ सदस्य.

● ‘निसर्गाची शाळा’या AAP वर कार्यक्रमात व्याख्यान

● विविध मान्यवर संस्थांमध्ये आयोजित कार्यक्रमात व्याख्याने.

● सदस्य-सार्वजनिक वाचनालय नाशिक

●सदस्य –मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबाद.

●सदस्य- महाराष्ट्र साहित्य परिषद, जलालपूर, नाशिक.


.

प्रकाशित लेखन

प्रा. विद्या सुर्वे बोरसे यांची एकूण नऊ पुस्तके प्रकाशित आहेत. 'बालसाहित्यः आकलन आणि समीक्षा' हा बालवाचकांसाठीचा ग्रंथ प्रमुख असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी लिहीलेला हा मराठीतील पहिला समीक्षा ग्रंथ आहे. इतर आठ पुस्तके ही पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरती मराठी भाषा व साहित्याचे अध्ययन करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.

बर्टोल्ट ब्रेख्त यांच्या कवितांचे त्यांनी मराठी अनुवाद केले आहेत. किशोर (मासिक) मध्ये त्यांनी ''वाचनानंद'' हे सदर चालवले. शालेय मुलांना या सदरामुळे विविध ग्रंथांचा परिचय झाला. दैनिक सकाळच्या नाशिक आवृत्तीमध्ये त्यांचे 'बालजगत' हे सदर होते. सकाळच्या सप्तरंग रविवार पुरवणीत त्या 'बालगुज' हा स्तंभ लिहित असतात.

इतर

विद्या सुर्वे यांचे एकवीस संशोधनात्मक लेख प्रकाशित आहेत. साहित्य अकादमी सहीत अनेक महत्त्वाच्या संस्थांच्या चर्चासत्रांमध्ये त्यांनी शोधनिबंधवाचन केले आहे. मराठी नवकादंबरी या विषयावरती त्यांचे विशेष संशोधन आहे. काव्याग्रह या नियतकालिकाच्या संपादक मंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. काव्याग्रह हे कवितेसाठीचे मराठी नियतकालिक असून मराठीसोबतच ते हिंदी आणि इंग्रजी भाषेतही स्वतंत्रपणे प्रकाशित होते.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!