वामन सुदामा निंबाळकर

वामन सुदामा निंबाळकर
जन्म १३ मार्च, इ. स. १९४३
मृत्यू ३ डिसेंबर, इ. स. २०१०
राष्ट्रीयत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय

प्रा. वामन सुदामा निंबाळकर हे मराठवाडा आणि विदर्भातले एक मराठी लेखक, विचारवंत आणि कवी होते.

बालपण आणि शिक्षण

त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील लांजूड या गावी १३ मार्च, इ. स. १९४३ रोजी झाला होता. त्यांचे शिक्षण औरंगाबाद येथे झाले. इतिहास, हिंदी आणि डॉ. आंबेडकर विचारधारा या विषयात त्यांनी एम.ए. केले होते.

कारकीर्द

  • मृत्यूपूर्वी तेरा वर्षे प्रा.वामन निंबाळकर नागपूर विद्यापीठाच्या डॉ.आंबेडकर विचारधारा विभागात अंशकालीन प्राध्यापक होते.
  • नागपुरात निंबाळकर यांनी इ. स. १९९१ पासून डॉ. आंबेडकर स्मृति व्याख्यानमाला सुरू केली होती.
  • निंबाळकरांनी औरंगाबादेत दलित पॅन्थरच्या स्थापनेनंतर नामांतर आंदोलन, मागासवर्गीयांसाठी शिष्यवृत्ती आंदोलन, मागास जाती-जमातील भटके आणि अल्पसंख्याकांना पडीत जमीनवाटप इत्यादी कार्यक्रम राबवले होते.
  • निंबाळकर महाराष्ट्र गव्हर्नमेंट ट्रेड नर्सेस असोसिएशनचे इ. स. १९७८ पासून सल्लागार होते.
  • त्यांनी प्रबोधन प्रकाशनाद्वारे 'आजचे प्रबोधन' नावाचे साप्ताहिक सुरू केल होते. याशिवाय भीमसंदेश, अस्मितादर्श, सुमचित, प्रबोधन, लोकायत, परिचारिका या नियतकालिकांच्या प्रकाशनांत त्यांचा सहभाग होता.
  • प्रबोधन प्रकाशनतर्फे लोककवी वामनदादा कर्डक यांच्या "वाटचाल', आणि कवी यशवंत मनोहर यांच्या "उत्थनगुंफा'चे प्रकाशन निंबाळकरांनी केले होते.
  • वामन निंबाळकर हे ...साली विदर्भ साहित्यसंघातर्फे घेण्यात येणाऱ्या विदर्भ साहित्यसंमेलनाचे, आणि, चंद्रपूर येथे .....रोजी पार पडलेल्या दहाव्या अ. भा. दलित साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
  • अखिल भारतीय(?) दलित साहित्य महामंडळाचही ते अध्यक्ष होते.
  • "सामाजिक क्रांतीची दिशा' या नावाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी प्राचार्य "युगयात्रा'कार प्रा. म. भी. चिटणीस यांचे समग्र वाङ्मय वामन निंबाळकरांनी प्रकाशित केले होते.

मराठी कवितेत डॉ. आंबेडकर हा त्यांचा पीएच.डी.साठी सुरू असलेला प्रबंध होता, तो त्यांना अखेरपर्यंत पूर्ण करता आला नाही. हृदयविकाराने त्यांचे ३ डिसेंबर, इ. स. २०१० रोजी, वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले.

वामन निंबाळकर यांची ग्रंथसंपदा

  • अस्मितादर्शची नऊ वर्षे
  • आई (काव्यसंग्रह)
  • गावकुसाबाहेरची कविता (काव्यसंग्रह)
  • दलित साहित्य - एक वाङ्‌मयीन चळवळ
  • दलित साहित्य - स्वरूप व भूमिका
  • बौद्धांच्या सवलती व पंतप्रधानाचे वक्तव्य
  • मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आंबेडकर यांचेच नाव का?
  • महाकवी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • महायुद्ध (काव्यसंग्रह)
  • राज्यघटनेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
  • वाहत्या जखमांचा प्रदेश (काव्यसंग्रह)
  • साठोत्तरी मराठी कवितेत आंबेडकरदर्शन
  • सामाजिक क्रांतीची दिशा (प्रा. म. भि. चिटणीस यांचे समग्र वाङ्‌मय)

संपादित पुस्तके

  • अखिल भारतीय दलित साहित्यसंमेलन (अध्यक्षीय भाषण)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा
  • दलित लिटरेचर - नेचर अँड रोल
  • दलितांचे विद्रोही वाङ्‌मय
  • सामाजिक लोकशाहीचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आगामी

  • आग (कथासंग्रह)
  • बाबासाहेबांच्या ४५० पत्रांचा संग्रह
  • मराठीतील सर्वोत्कृष्ट दलित कथा

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधला सहभाग

  • जागतिक मराठी परिषदेच्या (इ. स. १९९५) संमेलनात दिल्ली येथे सहभाग
  • इस्रायलमधील जेरूसलेम येथे झालेल्या जागतिक मराठी परिषदेत सहभाग
  • इजिप्तला इ. स. १९९६ मध्ये भेट
  • लंडन येथे इ. स. २००० साली "व्हॉइस ऑफ दलित इंटरनॅशनल' परिषदेत भाषण
  • इराणमधील तेहरान येथे इ. स. २००१ साली "आशिया पॅसिफिक रीजनल कॉन्फरन्स'मध्ये दलित मानवाधिकार राष्ट्रीय अभियानाचे प्रतिनिधित्व
  • दक्षिण आफ्रिकेतील दरबान येथे जागतिक वंशवादविरोधी परिषदेत प्रतिनिधित्व.

सन्मान आणि पुरस्कार

शासकीय समित्यांवर नेमणुका

  • महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य (१९८९ ते १९९३)
  • उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीच्या राज्य पुरस्कार परीक्षक समितीचे सदस्य (१९८२-८४)
  • रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य (१९८७ ते १९९३)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीचे सदस्य (१९८७ ते १९९३)
  • डॉ. आंबेडकर जन्मशताब्दी राज्यस्तरीय समितीवर सदस्य (इ. स. १९९१)
  • गुंटूर(आंध्रप्रदेश) येथील दलित मुक्त विद्यापीठाचे सदस्य,
  • श्रीमती रजनी सातव समितीचे सदस्य (१९८४-१९८६)
  • संचालक, महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ (१९९२-९३)

सन्मान

पुरस्कार

  • ’महायुद्ध' या काव्यसंग्रहाला उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचा शासनाचा पुरस्कार (इ. स. १९८८)
  • नवव्या अखिल भारतीय दलित साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष (इ. स. १९८९)
  • भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे डॉ. आंबेडकर पुरस्काराने सन्मानित
  • फुले-आंबेडकर साहित्य पंचायत साताराद्वारे दिला जाणारा फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार
  • रमाबाई आंबेडकर महिला मंडळाचा उपासक-रत्न पुरस्कार
  • रायपूर येथे इ. स. १९७६ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाच्या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान
  • लाखनी येथे इ.स. २००३मध्ये झालेल्या विदर्भ संघाच्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!