उंदीरमार बाज (इंग्लिश: Longlegged Buzzard; हिंदी:चूहामार,चूहामार बाज; संस्कृत: दीर्घपाद मूषिक-बाज; गुजराती:मोसमी टीसो) हा एक शिकारी पक्षी आहे.
ओळख
ह पक्षी आकाराने घारीएवढा असतो.मोठे रुंद पंख.तांबूस रंगाची गोलाकार शेपटी.वरील अंगाचा रंग पिंगट.डोके आणि मान पिवळट किंवा पांढरी.खालील भागाचा रंग पांढुरका.पोट पिंगट.
हा पाकिस्तानातील कोहट आणि गिलगिटपासून मकराणचा समुद्रकिनारा व सिंध,भारतात हिमालय,दक्षिणेकडे नेपाळ,सिक्कीम,दख्खनचा भाग,उत्तर बंगाल,भूतान आणि आसाम ह्या भूप्रदेशात हिवाळ्यात सापडतो.
सहसा हा पक्षी डोंगराळ जंगलाचा भाग.तसेच अधूनमधून मोकळी जागा असलेल्या डोंगराळ भागाचा विणीच्या हंगामात आश्रय हिवाळ्यात मात्र निम-वाळवंटे,शेते,वाड्या,तसेच,पानगळीच्या जंगलात वास्तव्य करतात.